
शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात हाणामारी; एकाचा झाला मृत्यू
किल्लेधारूर : शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात २४ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत चुलत्याच्या डोक्यात लाकूड मारल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आडस येथे घडली. जखमीला उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी (ता.२७) अंकुश नामदेव गायके (वय ५८) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुतण्या संदीप प्रभाकर गायके याला
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आडस येथील गायके कुटुंबात मागील काही दिवसांपासून शेती व झाडावरून वाद सुरू होता. या वादातून चुलते-पुतण्यात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एकमेकांना दगड व लाकडाने हाणामारी झाली होती. या मारहाणीत अंकुश गायके यांच्या डोक्यात लाकूड मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. आता पुतण्या संदीप प्रभाकर गायके याच्या तक्रारीवरून विजय नामदेव गायके, अंकुश नामदेव गायके, नामदेव गायके, दयानंद गायके या चौघांविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. उच्चस्तरीय तपासणी अहवाल प्राप्त होताच संदीप गायके याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. संदीप गायके यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Web Title: Agricultural Dispute Fighting Uncle And Nephew One Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..