Chhatrapati Sambhajinagar : मी सुद्धा चित्रपट महोत्सवाचे प्रॉडक्ट - आशुतोष गोवारीकर

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, 'स्थळ' चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट
ajanta verul international film festival ashutosh gowariker
ajanta verul international film festival ashutosh gowariker sakal

छत्रपती संभाजीनगर : सिनेमा कुणाला आवडतो का. माझा सिनेमा कसा असेल, त्यावर बंदी येईल का, असा कुठलाही विचार न करता सिनेमा बनवा. आज भलेही ओटीटीवर सिनेमे बघता येत असली तरीही ओटीटीवर तुम्ही एकटे असता. पण चित्रपट महोत्सवात तुम्ही इतरांशी चर्चा करता.

ग्लोबल सिनेमातून अनेक विषय कळतात. आंतरराष्ट्रीय भाषा कळते. मी स्वतःही अशाच चित्रपट महोत्सवाचा प्रॉडक्ट आहे. 'लगान' स्वित्झर्लंडच्या लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोचल्यानेच लगानला अॉस्करमध्ये पोचण्याचा मार्ग थोडा सोपा झाला, असे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले.

९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी गोवारीकर यांच्या उपस्थितीत आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे समारोप झाला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, भारतीय सिनेमा स्पर्धा गटाचे ज्युरी चेअरमन ज्येष्ठ अभिनेते धृतिमान चॅटर्जी, फ्रिप्रेस्की इंडियाचे ज्युरी चेअरमन एन. मनू. चक्रवर्ती, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम,

कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते. आशुतोष गोवारीकर पुढे म्हणाले, पहिल्यांदा चित्रपट बनवणारे किंवा चित्रपट क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांनी चित्रपट नक्की बनवावा.

लगान लोकार्नो चित्रपट महोत्सवात पोचला तेव्हा हा चित्रपट या महोत्सवाच्या निकषास पात्र होत नव्हता. पण तरीही तिथल्या आयोजकांनी आम्हाला संधी दिली. ज्या लोकांना क्रिकेट समजत नाही. ज्यांना सॉकर कळते ती प्रेक्षक सुद्धा खुर्चीवर बसून अक्षरशः सिनेमातील भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत होती. चित्रपट हेच करतो. सिनेमा बनवणे कला आहे. ती साध्य करत रहा, या शब्दांमध्ये गोवारीकर यांनी तरूणांना प्रोत्साहन दिले.

चांगला सिनेमा आयुष्याची समज देतो. चांगले सिनेमा अशा महोत्सवातच बघायला मिळतात, असे चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले. आशुतोष गोवारीकर एक विचारवंत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या स्वदेस आणि लगानचे उदाहरण मी नेहमी देतो, असे अशोक राणे म्हणाले.

मी कानडी भाषिक. आमच्या भागात सिनेमा बघितल्याशिवाय साप्ताहिक सुटी पूर्ण होत नाही. अनेकदा सिनेमा तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात प्रेरित करतात. मलाही गोवारीकर यांच्या स्वदेश सिनेमाने प्रेरणा मिळाली. लातूरमध्ये एक शासकीय योजनेची अंमलबजावणी करताना या सिनेमाची आठवण यायची.

वैयक्तिक आयुष्यातही सिनेमातील डायलॉग ऐकवत हिणवले गेले तेव्हा मी जिल्हाधिकारी झालो. मराठी भाषा मला मराठी सिनेमाने शिकवली, असे श्रीकांत म्हणाले. कोणतीही कला ही जीवनाचा भाग असून चित्रपट हा समाजाचा आरसा असतात.

चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोचवण्याचा मोठे माध्यम म्हणून आपण चित्रपटांकडे पाहतो. पोलिसांचा चित्रपटातील वाटा अप्रत्यक्ष असला तरी बहुतांश चित्रपट आमच्याशिवाय पूर्ण होत नाही. पूर्वीच्या सिनेमात पोलीस उशिरा पोचतात,

असे दाखवायचे. आता मात्र पोलीस वेळेत पोचतात याची दखल दिग्दर्शकांनी घ्यावी, असे ज्ञानेश्वर चव्हाण विनोदाने म्हणाले. सूत्रसंचालन ज्ञानेश झोटिंग व पूर्वी भावे, प्रास्ताविक नंदकिशोर नंदकिशोर कागलीवाल यांनी केले.

२०१९ मध्ये पानिपत सिनेमाच्या शुटिंग लोकेशनसाठी म्हणून मी दौलताबादच्या किल्ला बघितला होता. त्यापूर्वी दहा वर्षांपूर्वी मी अजिंठा आणि वेरूळ लेणी बघितल्या. आता चित्रपट महोत्सवात आलो. म्हणजे या शहराशी मी इतिहास, कला आणि चित्रपटाच्या माध्यमातून जोडलो गेलो, असे भावोद्गार आशुतोष गोवारीकर यांनी काढले.

मराठवाड्यातील चित्रपटांना जागतिक सिनेमाशी स्पर्धा करण्याची संधी अजिंठा- वेरूळ चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. जे विद्यार्थी चित्रपट समीक्षक बनु पाहत आहेत, त्यांच्यासाठी 'यंग क्रिटिक लॅब' या वर्षीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे अशोक राणे यांनी जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com