पाचोड : येथील अजिंक्य अशोकराव डोईफोडे १० वर्षांपासून १० शाळेतील अकराशे विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या वह्यांचे मोफत वाटप करत आहे..वाढदिवस किंवा एखाद्या कार्यक्रमाला वह्या, शालेय साहित्याचे वाटप करून प्रसिद्धी मिळविणारी व्यक्ती आपल्याला बघायला मिळते. मात्र, शिक्षणप्रेमाने भारावलेला तरुण अजिंक्य डोईफोडेने १० वर्षांत कोणताही गाजावाजा न करता विद्यार्थांना वह्यांचे वाटप करत शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देत आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अजिंक्यने बिकट परिस्थितीत पदवीपर्यंत शिक्षण घेतले. बारा वर्षांपूर्वी व्यवसाय उभारला. आता आपल्याला दोन पैसे मिळतात..Chh. Sambhaji Nagar News : ३३० किमी सायकल वारीने पंढरपूर गाठलं; ५३ सायकलपटूंनी दिला पर्यावरणाचा मंत्र.आपण समाजाचे देणे लागतो, या विचाराने अजिंक्यने थेरगाव, वडजी, पाचोड बु, पाचोड खुर्द, लेंभेवाडी, जामखेड व कल्याणनगर येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले..अजिंक्यच्या कर्तृत्वाची दखल घेत मुख्याध्यापक माधव बिनवडे, रामनाथ मोहीते, आबासाहेब टकले, भरत सानप, प्रदिप मुंगसे, आदिनाथ बागडे, साधना चक्रे, सरोज हांडे, कांचन लेंभे, सुरेखा काळे, सुकन्या बगाटे यांनी गौरव केला..अजिंक्यचे कार्य उल्लेखनीय आहे. कोणतीही प्रसिद्धी न करता १० वर्षांपासून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप सुरू आहे. हा उपक्रम धनदांडग्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे.- रामनाथ मोहिते, शिक्षक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.