Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

Who is Ajinkya Shinde from Ujani village Ausa : औसा तालुक्यातील उजनीचे अजिंक्य शिंदे यांनी संगणक अभियंत्याची नोकरी सोडून समाजकारणाचा मार्ग स्वीकारला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून प्रेरित शिंदे आता दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या नेतृत्वामुळे चर्चेत आले आहेत.
Who is Ajinkya Shinde

Who is Ajinkya Shinde

esakal

Updated on: 

औसा : संगणक अभियंत्याची सुरक्षित नोकरी सोडून आंदोलनाच्या वाटेवर आलेला औसा तालुक्यातील उजनी गावचा तरुण आता दिल्लीतील राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आला (Ajinkya Shinde CJP movement latest news) आहे. सीजेपीचे अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी आशुतोष व सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावर अटक झाल्यानंतर संघटनेच्या पुढील आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपविण्याची घोषणा करण्यात आली आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून प्रेरणा घेत समाजकारणात उतरलेले आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेले शिंदे आता नव्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com