Aurangabad News : पैठणमध्ये दारूच्या बाटलीसाठी मद्यपी चढतात चक्क टाॅवरवर

दारुच्या बाटलीसाठी मद्यपी चढला टाॅवरवर
Aurangabad Latest News
Aurangabad Latest Newsesakal

पाचोड (जि.औरंगाबाद) : चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. नुकतेच दोन दिवसांपासून चक्क एक युवक धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) मनोऱ्यावर (टाॅवर) चढून दारूची बाटली द्या तेव्हा मी खाली उतरतो, तर दुसऱ्या दिवशी दारू बंद करा मी उतरतो असे म्हणत चक्क चार-पाच तास मद्यपीने गोंधळ घालत उपस्थितांचा जीव भांड्यात पाडल्याची घटना सोमवारी (ता.२१) औरंगाबादमधील (Aurangabad) पाचोड (ता.पैठण) येथे घडली. राज्य सरकारने नुकतेच वाईन शॉप, मॉलसह किराणा दुकानात दारू ठेवणे व विकण्याची परवानगी देऊ केली आहे. परंतु या घटनेचे काय परिणाम होऊ शकतात. त्याची एक झलक पाचोड येथील एका मद्यपीने दाखवून दिले आहे. मद्याच्या आहारी गेलेल्या या युवकाने चक्क येथील भारतीय संचार निगमच्या कार्यालयांमधील मनोऱ्यावरती चढून दोन ते तीन तास गोंधळ घालत एक दारूची बाटली द्या तेव्हा खाली येतो असे म्हणत पहिल्या दिवशी तमाशा केला. (Alcoholic Persons Step Up On BSNL Tower In Pachod Of Aurangabad)

Aurangabad Latest News
औरंगाबादमध्ये तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, मृतदेह पाहाताच नातेवाईकांना...

हे प्रकरण एवढ्यावर न थांबता दुसऱ्या दिवशी त्याची पुन्हा पुनरावृत्ती घडली. दुसऱ्या दिवशी मात्र त्याने गावांतील अवैध दारू बंद करा, तेव्हा खाली उतरतो. अन्यथा जीव देतो असे म्हणत अवघे पाच-सहा तास मनोऱ्यावर चढुन गोंधळ घालत महामार्गावर गर्दी जमविली. दोन दिवसांपासून येथील तीस वर्षीय युवक भारतीय संचार निगमच्या परिसरात उभारलेल्या प्रांगणातील मनोऱ्यावर चढुन वेगवेगळ्या मागण्या मांडत आहे. रविवारी (ता.२०) सकाळी पाचोड येथील भारतीय संचार निगम कार्यालयात गेला. त्यावेळी तो या कार्यालयातील मनोऱ्यावर चढला अन् मला एक देशीची क्वाॅर्टर द्या. तरच मी खाली येतो अन्यथा मी वरती बसून राहील, असे तो वरून बोलत होता. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२१) पुन्हा तो युवक या मनोऱ्यावर चढला. अन् गावांतील दारूबंद करा तेव्हा मी खाली उतरतो असे म्हणत मनोऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गेला. तो पहिलाच ऐवढा मद्यपान करून होता की त्यास साधे चालणे व बोलणे येत नव्हते. तरी हा युवक या मनोऱ्यावर जवळपास तीस फुटांपेक्षा जास्तीवर जाऊन बसला होता. हा युवक मनोऱ्यावर चढल्यानंतर मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करून गोंधळ घालत होता.

Aurangabad Latest News
Osmanabad जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा पराभव, महाविकास आघाडीचे वर्चस्व

त्यावेळी गावातील नागरिकांच्या लक्षात आले की, कोणी तरी मनोऱ्यावर चढले आहे. त्यावेळी गावकऱ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यास खाली उतरण्याची विनंती केली. मात्र तो त्या नागरिकांना एक दारूची बाटली मागत होता. त्यावेळी घटनास्थळी असणाऱ्या एका व्यक्तीने त्यास 'तुला दारूची क्वॉर्टर देतो तु प्रथम खाली ये, असे म्हणत त्याला दिलासा दिला. त्यावेळी तो मद्यपी मोठ्या विनवणीनंतर खाली उतरला. पुन्हा सोमवारी तो याच मनोऱ्यावर चढला व दारू (Liquor) बंद करा, तेव्हा खाली येतो म्हणुन तो ओरडू लागला. चक्क पाच-सहा तास तो मनोऱ्यावर बसुन गोंधळ घालत होता. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी घटनास्थळी जमा झाली होती. पाच सहा तासानंतर तो खाली उतरला अन् घटनास्थळावरील गर्दी ओसरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com