Sambhaji Nagar News : काल शहरात दिवसभरातील सर्व अहवाल निगेटीव्ह

तूर्त दिलासा : १४१ संशयितांच्या चाचण्या
कोरोना
कोरोनाsakal

छत्रपती संभाजीनगर : कोरोना संसर्गाच्या नव्या व्हेरिएंटची दहशत वाढत असताना शहरात गुरुवारी (ता.२१) सिडको भागात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी (ता. २२) १४१ रुग्णांची अ‍ॅण्टीजेन, आरटीपीसीआर चाचणी केली. त्यातील ८२ रुग्णांची अ‍ॅण्टीजेन चाचण्या निगेटिव्ह आल्या. ५९ पैकी ५८ रुग्णांच्या आरटीपीसीआरचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

संभाजीनगर शहरात गुरुवारी सिडको एन-७ भागातील दहा वर्षांची मुलगी आणि ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह मेल्ट्रॉन हॉस्पिटल व पदमपुरा आयओसी केंद्रात दिवसभरात १४१ संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली.

कोरोना
Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरचे पोलिस ठरले सायबर गुन्हेगारांनाही भारी

८२ रुग्णांची अ‍ॅण्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली. त्यासोबतच ५९ पैकी ५८ रुग्णांच्या आरटीपीसीआरचे स्वॅब तपासणीसाठी घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २९ रुग्णांचे आरटीपीसीआरचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २३ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. एकही अहवाल पॉझिटिव्ह आले नसल्याने दिलासा मिळाला आहे. उर्वरित सहा जणांचे अहवाल शनिवारी (ता.२३) प्राप्त होणार आहेत.

नव्या जेएन-१ व्हेरिएंटचा रुग्ण शहरात असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरून न जाता ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले, आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. पारस मंडलेचा यांनी केले. महापालिकेने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तयारी केली आहे. व्हीटीएमच्या १६ हजार आणि अ‍ॅण्टीजेनच्या दोन लाख किट महापालिकेकडे आहेत. आवश्‍यक औषधी साठाही आहे तर रेमडिसिव्हिर, अ‍ॅण्टीबायोटिक औषधींच्या निविदा अंतिम असून, केवळ आदेश देणे बाकी आहे, असे डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले.

कोरोना
Sambhaji Nagar : खंडणीखोर भावांनी पुन्हा मागितले २० लाख रुपये

रुग्णांच्या संपर्कातील नातेवाइकांची चाचणी

सिडको एन-७ येथील दहावर्षीय मुलीच्या संपर्कातील चार नातेवाइकांची आणि ६५ वर्षीय महिलेच्या पतीची आरटीपीसीआर स्वॅब महापालिकेने शुक्रवारी घेतले. हे स्वॅब तपासणीसाठी घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com