Sambhaji Nagar : संभाजीनगर शहरात अंतर्गत पाइपलाइनच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप

ठाकरे गटाची मुख्य सचिवांकडे तक्रार
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात टाकल्या जाणाऱ्या एचडीपीई पाइपच्या कामात गैरव्यवहार सुरू असून, नियमबाह्य पद्धतीने ही कामे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गटा) माजी सभापती राजू वैद्य यांनी केला आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.

शहरात २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाइपलाइनची कामे सुरू आहेत. त्यात मुख्य पाइपलाइन, टाक्यांना पाणीपुरवठ्या करणाऱ्या पाइपलाइन, गल्लीत अंतर्गत पाइपलाइन अशा कामांचा समावेश आहे. ज्या भागात महापालिकेने आतापर्यंत पाइपलाइन टाकलेली नाही, तिथे बहुतांश ठिकाणी एचडीपीई पद्धतीचे पाइप टाकले जात आहेत.

या कामावर वैद्य यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, एचडीपीई पाइप वापरण्याचे काही नियम आहेत. पाइपलाइन करताना हे पाइप फरफटत नेऊ नयेत, त्याला आवरण असणे गरजेचे आहे, ज्या ठिकाणी हे पाइप ज्याठिकाणी साठविण्यात आले आहेत, तिथे ते पाइपच्या साईजनुसार साठवावेत.

या कामावर वैद्य यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, एचडीपीई पाइप वापरण्याचे काही नियम आहेत. पाइपलाइन करताना हे पाइप फरफटत नेऊ नयेत, त्याला आवरण असणे गरजेचे आहे, ज्या ठिकाणी हे पाइप ज्याठिकाणी साठविण्यात आले आहेत, तिथे ते पाइपच्या साईजनुसार साठवावेत.

जमिनीत पाइप टाकताना एक फुटाच्या मुरमाचे अच्छादन करणे गरजेचे आहे. त्यामुळे हे पाइप फुटणार नाहीत. प्रत्येक २०० मीटरवर जलचलित चाचणी (हायड्रोलिक टेस्टिंग) घेणे गरजेचे आहे. मात्र, हे नियम न पाळता शहरात कामे केली जात आहेत. या नियमांचे पालन करण्याची निविदेत निधीची तरतूद करण्यात आली आहे.

नियमांनुसार तरतूद न करता कामाचे पैसे मात्र उचलले जात आहेत, नियमबाह्य पद्धतीने काम करून गैरव्यवहार केला जात असल्याने कंत्राटदारांचे बिले देण्यात येऊ नयेत, अन्यथा याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com