Crime News : दुधात चॉकलेटसारखी गोळी टाकून अल्ताफ करायचा अत्याचार; अल्पवयीन पीडितेचा पोलिसांसमोर आक्रोश

ज्याच्या अंगाखांद्यावर ती खेळली. ज्याचं बोट धरून ती चालायला शिकली. विश्वासानं ज्याच्यात ती आपला बाप पाहत होती. त्यानंच तिच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केला.
crime against girl
crime against girlesakal

छत्रपती संभाजीनगर - ज्याच्या अंगाखांद्यावर ती खेळली. ज्याचं बोट धरून ती चालायला शिकली. विश्वासानं ज्याच्यात ती आपला बाप पाहत होती. त्यानंच तिच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केला. या प्रकरणी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नराधम सावत्र बापाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली.

पोलिसांनी आरोपीला मध्यरात्री अटक केली. अल्ताफ (वय ३२, नाव बदललेले आहे) असे आरोपीचे नाव आहे. तो दुधात चॉकलेट सारखी गोळी मिसळून अत्याचार करीत असे.

या घटनेची माहिती अशी - १५ वर्षीय पीडिता दोन वर्षांची होती तेव्हा तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेऊन एका व्यक्तीसोबत आंतरधर्मीय विवाह केला. पीडितेला १८ वर्षांचा सख्खा मोठा भाऊ आहे. अल्ताफपासून पीडितेच्या आईला अब्दुल झाला.

मात्र, अब्दुल हा आपला मुलगा नसल्याचा संशय घेऊन अल्ताफ पीडितेच्या आईला मारहाण करत असे. एक दिवस पीडितेसह तिची भावंडं घराबाहेर असताना पीडितेच्या आईने फोन करून ‘अल्ताफने आपल्याला मारहाण केली असून, लवकर घरी ये!’

असा फोन केला. पीडिता घरी आली तेव्हा अल्ताफच्या गळ्याभोवती ओरखडल्याच्या खुणा दिसल्या; तसेच घरात काचेचे तुकडे पडलेले दिसले. पीडितेला तिची आई न दिसल्याने तिने अल्ताफला विचारणा केली. त्यावर त्याने ‘तुझी आई आपल्याला सोडून निघून गेली’ असे सांगितले. त्यानंतर आरोपी अल्ताफने आपल्याला मुंबईला जायचे आहे, असे सांगितले. त्यावर विश्वास न बसल्याने पीडितेने शेजारी चौकशी केली.

पीडितेच्या आईच्या डोक्याला मार लागलेला होता; तसेच डोक्यातून रक्त येत होते आणि अल्ताफ हा तिच्या मागे लाकडी दांडा घेऊन पळताना दिसल्याची माहिती तिला शेजाऱ्यांकडून मिळाली. तेव्हापासून पीडितेची आई अद्याप बेपत्ता आहे.

घेऊन गेला मुंबईला

आरोपी अल्ताफ पीडितेसह सर्वांना घेऊन मुंबईला गेला. तिथे आठ दिवस राहिला. नंतर ते सर्वजण शहरातील घरी आले. दुसऱ्या दिवशी अल्ताफने पीडितेवर अत्याचार केळा. महिनाभर शहरात राहिल्यानंतर आरोपी पीडितेला घेऊन फुलंब्रीला गेला. तिथे दुधात कोणती तरी चॉकलेटी गोळी मिसळून तो वारंवार बळजबरीने तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे पीडितेने जबाबात म्हटले.

विवस्त्र नाचायला लावले

अल्ताफ पीडितेला भारतनगरातील घरी घेऊन गेला. तिथे कधी दुधात, तर कधी पाण्यात चॉकलेटी रंगाच्या गोळ्या टाकून खायला देत असे. त्याच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केले. कधीकधी पीडितेला विवस्त्र नृत्य करायला भाग पाडत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सावत्र बापाला लाथ घालून पळाली

२३ ऑक्टोबरला सायंकाळी पीडिता ही तिच्या मैत्रिणीसोबत कर्णपुरा यात्रेत गेली होती. रात्री तिला यायला उशीर झाला होता. त्या रात्री पुन्हा अल्ताफने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता तिने आरोपी पित्याला लाथ घातल ती घरातून बाहेर पडल्याचेही जाबावात नमूद केले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या समाजसेवकांनी पीडितेसह पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com