पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणले, अंबादास दानवेंचा भाजपवर आरोप | Ambadas Danve | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambadas Danve Allegation On BJP Rally In Aurangabad

पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणले, अंबादास दानवेंचा भाजपवर आरोप

औरंगाबाद : हा मोर्चा अपयशी ठरला आहे. पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणलं आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. आज सोमवारी (ता.२३) भाजपच्या वतीने औरंगाबाद (Aurangabad) येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर दानवे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, पैसे देऊन महिलांना जल आक्रोश मोर्चा आणले असून मी तुम्हाला व्हिडिओ देतो. (Ambadas Danve Allegation On BJP For Giving Money To Peoples For Rally Participation In Aurangabad)

हेही वाचा: महाविकास आघाडी सरकार हे बहिरे आहे, भागवत कराड यांचे टीकास्त्र

या मोर्चा प्रसंगी भाजप व शिवसेना यांचा वाद पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांनी सेनेचे बॅनर फाडल्याचे दिसले. राज्यात व केंद्रात सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचा पाणीप्रश्न का सोडवला नाही, असा सवाल शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. हा पाणी मोर्चा नसून राजकीय मोर्चा असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा: छत्रपती संभाजी राजे आमचे, त्यांच आणि आमचं नातं आहे: राऊत

खैरे तुम्ही समांतर योजना खांद्यावरुन खाली येऊ द्या. ती चालू लागेल. मात्र ती आवळून धरली, असा टोला आमदार हरिभाऊ बागडे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लगावला. सगळं शहर पाणी-पाणी मागत आहे. अंगावर आलो तर शिंगावर घेऊ, अरे तुम्हाला शिंग राहिले तरी कुठे ? आता तुम्ही बोडखे झाला आहात. खैरे डोक्यावर हात लावून पाहा, शिंगे राहिली की नाही?, असा सवाल त्यांनी केला. हिंदुत्वाची उठा ठेव शिवसेनेने करु नये. आज देखील कार्यकर्त्यांची कामे बंद आहेत. हा आक्रोश मोर्चा, संघर्ष मोर्चा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बागडे यांनी शिवसेनेला दिला.

Web Title: Ambadas Danve Allegation On Bjp For Giving Money To Peoples For Rally Participation In Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top