esakal | कोरोनाच्या लढाईत शासनाला सर्वांनी सहकार्य करावे - नवेली देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या लढाईत शासनाला सर्वांनी सहकार्य करावे - नवेली देशमुख

कोरोना प्रसाराचा वेग लक्षात घेता युवकांबरोबर सर्वांनीच स्वतःची काळजी घ्यावी. हात वारंवार धुवावेत. परदेशातून आलेल्यांनी आपली चाचणी अवश्‍यक करावी. देश लवकर या संकटातून मुक्त होण्यासाठी मदत करावी. 

कोरोनाच्या लढाईत शासनाला सर्वांनी सहकार्य करावे - नवेली देशमुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाच्या जागतिक संकटाला सामोरे जाण्यासाठी गांभीर्याने शासनाला सहकार्य, मदत करावी असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेची ब्रँणड अँम्बेसेडर, निवडणुक आयोगाची डिस्ट्रीक्ट आयकॉन नवेली देशमुख ने केले. 

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सोशल मिडीयाच्या माध्यामातून व गरज पडेल तिथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपली मदत सेवा राष्ट्राला द्यावी. कोरोनासंबंधी जनजागृती, घ्यावयाची काळजी, वेळोवेळी निघणारे शासकीय आदेश सोशल मिडीयाद्वारे लोकांपर्यंत पोहचवावेत.

हेही वाचा- होम क्वारंटाईन नागरीकांच्या घरासमोर लागणार फलक

कोरोना प्रसाराचा वेग लक्षात घेता युवकांबरोबर सर्वांनीच स्वतःची काळजी घ्यावी. हात वारंवार धुवावेत. परदेशातून आलेल्यांनी आपली चाचणी अवश्‍यक करावी. देश लवकर या संकटातून मुक्त होण्यासाठी मदत करावी. 

स्वच्छता कमर्चाऱ्यांसोबत संवाद

महापालिका स्वच्छता दुत असल्यामुळे नवेली देशमुख ने घरोघरी जावून कचरा उचलणारे, रस्ते स्वच्छ करणाऱ्या कामगांशी संवाद साधून त्यांना पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनिटायझर्स, हातमोजे उपलब्ध नसल्याबाबत चिंता व्यक्त केली.