छत्रपती संभाजीनगर : एंड्रेस हाउझर कंपनीला छत्रपती संभाजीनगरात त्यांच्याच प्रकल्पाशेजारी असलेली १० एकर जमीन प्रकल्प विस्तारासाठी हवी होती. आपण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर अवघ्या अडीच तासांत ही जमीन देण्याचा निर्णय झाला. .इतके गतिमान काम आम्ही करीत असून स्वित्झर्लंडमधील उद्योगांनी येथे गुंतवणूक केल्यास त्यांनाही असेच सहकार्य करू, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले. इटलीनंतर स्वित्झर्लंड, स्वीडनच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री गोयल यांनी बर्न येथे स्विस उद्योजकांशी चर्चा करून भारतात गुंतवणुकीच्या अमाप संधी असल्याचे सांगितले..भारत सरकार उद्योगस्नेही असून, त्याचा फायदा स्विस उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हे सांगताना त्यांनी स्विस कंपनी एंड्रेस हाउझरच्या बाबतीत झालेला ताजा प्रसंग सांगितला. एंड्रेस हाउझर ही स्विस कंपनी २००३ पासून छत्रपती संभाजीनगरात आहे..येथील त्यांच्या प्रकल्पाशेजारी असलेली १० एकर जागा विस्तारित प्रकल्पसाठी हवी होती. त्यांनी त्यासाठी पात्रव्यवहारही केला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मला त्याची आजच माहिती दिली. मी त्यांच्याकडील कागदपत्रे मागवली आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली..Chh. Sambhaji Nagar News : मे महिन्यातील पावसाने मराठवाड्याची हानी; १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान.त्यानंतर अवघ्या अडीच तासांत एमआयडीसीने ही जमीन एंड्रेस हाउझरला देण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले. हे सांगताना त्यांनी मोबाइलवरील तो संवादही वाचून दाखवला. भारत सरकार आणि राज्य सरकारे उद्योगांना सहकार्य देण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.