Sambhaji Nagar : पैठण येथे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

प्रलंबित राज्यभरातील मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे मागील एक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

पैठण : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून अंगणवाडी सेविकांना कामावर हजर अन्यथा कामावरून कमी करण्याची कारवाई केली जाईल, असे पत्राने कळविण्यात आले आहे. या निषेधार्थ पैठण येथे गुरुवारी (ता.११) एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आयटक प्रणीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी युनियन तर्फे निदर्शने करण्यात आली.

प्रलंबित राज्यभरातील मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे मागील एक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे. त्यामुळे मागील एक महिन्यापासून अंगणवाड्यांच्या बंद आहे.

यामुळे स्तनदा माता, अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या पोषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असला तरी जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याच्या निर्णयावर अंगणवाडी सेविका ठाम आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून कामावर हजर राहा अन्यथा कामावरून कमी करण्याची कारवाई केली जाईल‌ असे पत्र अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे.

सेविका व मदतनीसांना नोटीस बजावल्या. हा प्रकार चुकीचा आहे. याविरोधात १६ जानेवारीला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

-कॉ.ज्योती गायकवाड, खंडागळे, राज्य कौन्सिल सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com