esakal | गुन्हेगारांसोबतचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल, विरोधकांनी केली टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Home Minister Anil Deshmukh Viral Photo With Criminals

गृहमंत्री देशमुख तीन गुन्हेगारांसोबत उपस्थित असल्याचे दिसत आहे. यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

गुन्हेगारांसोबतचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल, विरोधकांनी केली टीका

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : गृहमंत्री अनिल देशमुख सध्या चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात औरंगाबादच्या दौऱ्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात गृहमंत्री देशमुख तीन गुन्हेगारांसोबत उपस्थित असल्याचे दिसत आहे. यावर विरोधकांकडून टीका होत आहे. फोटोतील कलीम कुरेशी, सय्यद मतीन, जफर बिल्डर या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असताना राज्याच्या गृहमंत्र्यांना त्यांच्याबरोबर उपस्थित राहणे किती संयुक्तिक यावर सध्या राज्यात चर्चा सुरु आहे.

सहायक पोलिस निरीक्षक ताईतवाले यांच्यावर औरंगाबादेत जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु


यावर गृहमंत्री अनिल देशमुख  माध्यमांशी बोलताना म्हणाले, की मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशा वेळी कोणती व्यक्ती, त्याचा व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन. कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर औरंगाबाद शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

संपादन - गणेश पिटेकर

loading image