esakal | सावरकरांपेक्षा अण्णाभाऊ साठेंना द्या भारतरत्न : इम्तियाज जलील 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

मी अजून चार वर्ष खासदार आहे, जेव्हा केव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी मला संसदेत भेटतील तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मातंग क्रांती मोर्चाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. 

सावरकरांपेक्षा अण्णाभाऊ साठेंना द्या भारतरत्न : इम्तियाज जलील 

sakal_logo
By
जगदीश पानसरे

औरंगाबादः हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेवर चालेल. मोदी, शहा किंवा उध्दव ठाकरे यांच्या बोलण्यावर चालणार नाही. इंग्रजांची माफी मागणारे आणि आरएसएसच्या विचारांना जवळचे असलेल्या सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. पण भारतरत्नचे खरे मानकरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आहेत, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. 

मी अजून चार वर्ष खासदार आहे, जेव्हा केव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी मला संसदेत भेटतील तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मातंग क्रांती मोर्चाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. 

औरंगाबादचे नाव आता खरेच बदलणार

सिल्लोड तालुक्‍यातील अंधारी येथील विवाहित महिलेला तिच्या घरात घूसन एका बारचालकाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. या घटनेत त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज मातंग क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्तांना मोर्चा काढून निवदेन देण्यात आले. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी इम्तियाज जलील आले होते. 

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फासावर लटकवा

अंधारी येथील घटनेची माहिती कळताच मी संसदेत या विरोधात प्रश्‍न उपस्थित करून हिंगणघाट आणि अंधारी प्रकरणातील आरोपींविरुध्द फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फासावर लटकवा अशी मागणी केली होती. समाजातील अशा घटना रोखायच्या असतील तर आपपल्या भागातील दारूची दुकाने बंद करा हीच या मयत ताईला खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल. अंधारी येथील बारचालकानेच हे भयानक कृत्य केले होते, त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी दारू विक्रीवर बंदी आणली पाहिजे. 

आडमार्गात का उतरले पर्यटक - वाचा

देशात सध्या वेगळेच वातवरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देश आपल्या इशाऱ्यावर चालेल असे वाटत आहे. पण हा देश त्यांच्या धोरणांनूसार चालणार नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेवर चालेल याचा पुनरुच्चार इम्तियाज जलील यांनी केला. सरकारे येतात, जातात, ते फक्त पाच वर्ष असतात, पण समाज वर्षानुवर्ष असतो. आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यायचा असले तर आपण संघटित राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. 

loading image
go to top