सोनपावलांनी झाले ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आगमन

Arrival of Gauri Ganesha in Jallosha at home Auranagabad News
Arrival of Gauri Ganesha in Jallosha at home Auranagabad News

औरंगाबाद : गणरायच्या पाठोपाठ मंगळवारी (ता. २५) कोरोनाच्या सावटाखाली घराघरांत जल्लोषात ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आगमन झाले. महालक्ष्मीचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. 

मंगळवारी दुपारी दोनपासून ते संध्याकाळी बैठकीच्या खोलीत ज्येष्ठा व कनिष्ठा विराजमान झाल्या. ‘लक्षुम्या’ येणार म्हणून सकाळपासूनच सुना-सासवांची लगबग सुरू होती. आठ दिवसांपासून घरात स्वच्छता आणि खरेदीत गृहिणी गुंतल्या होत्या तर लहानथोरांचा सजावटीचे कामे सकाळपासूनच सुरू होते. अंगणातल्या तुळशीपासून देवघरापर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांच्या पायघड्या घालून त्यावर हळदी-कुंकू वाहण्यात आले होते. 

गौरीच्या आगमनानिमित्त संपूर्ण परिवार एकत्र आला. मखर, सजावट, लाईटिंग लावण्यात दिवसभरात आगमनाची तयारी सुरू होती. काही घरांत आपल्या लाडक्‍या लेकींच्या, ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींच्या भेटीनंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करून साखर वाटण्यात आली. माहेरवाशीण असलेल्या गौराईच्या आगमनानंतर घराघरांत नवचैतन्य निर्माण झाले होते. कोरोनाचे संकट दूर होऊ दे अशी प्रर्थनाही करण्यात आली. सिडको एन-तीन येथील धोंगडे कुटुंबीयांनी कोरोनाचे संकट, लॉकडाउनची स्थिती तर दुसऱ्या बाजूला राममंदिराचा सुटलेला प्रश्‍न यांचा देखावा केला होता. 

हेही वाचा-  Good News : अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Video पहा)  

१६ प्रकारच्या भाज्या 
आगमनानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मींना आणि त्यांच्या पिलांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दिला जातो. १६ प्रकारच्या ऋतुकालोद्भव भाज्या बनवल्या जातात. त्यात मेथी, पडवळ, भेंडी, वांगी, घोसाळे, दोडके आदी भाज्यांचा समावेश असतो. या दिवशी प्रत्येक घरातील असलेल्या प्रथेनुसार एक, दोन, पाच, अकरा सुवासिनींना जेवण दिले जाते. पूजेतील केवड्याचा घरभर दरवळ उठतो. गुरुवारी (ता.२७) हळदी-कुंकू करून त्यांची पाठवणी केली जाईल. 

कोरोनामुळे भाज्यांच्या मागणीला फटका
दरवर्षी महालक्ष्मीच्या आगमन नंतर दुसऱ्या दिवशी पूजन व नेवैद्य दाखवण्यात येते यावेळी जेवणावळीसाठी आमंत्रण दिल्या जाते. पण यंदा कोरोनामुळे बाहेरील ओळखीच्याना कोणालाच आमंत्रण दिल्या गेले नाही. यामुळे भाजी मंडईत १६ प्रकारच्या भाज्यांची मागणी निम्मापेक्षा जास्त घटली. सागर पुंड या भाजीविक्रेत्याने सांगितले की, प्रत्येक परिवार कमीतकमी सर्व प्रकारच्या एक ते दीड किलो भाज्या खरेदी करत पण यंदा पावशेर भाजी खरेदी करणारे जास्त होते. १६ प्रकारची एकत्रित भाजी १०० रुपये प्रति किलो विकली जात होती. मागील वर्षी पेक्षा किलो मागे भाजी २० रुपयांनी महागली होती. 

हेही वाचा- रशियातील मोठ्या उद्योगाला ‘ऑरिक’मध्ये ४३ एकर जागा   

३० टक्के फुलांची आवक
यंदा कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली नाही. त्याचा परिणाम सध्या जाणवत आहे. महालक्ष्मी सण असूनही बाजारात अवघी ३० टक्के फुल्यांची आवक झाली. बाहेरील जिल्ह्यातुन आवक झाली नाही. यामुळे कालपेक्षा आज ,  किलो मागे भाव ५० रुपयांनी वाढले होते. झेंडू १५० ते २०० रुपये, गलेंडा १५० ते२०० रुपये तर शेवंती ३०० ते ४०० रुपये किलो विकल्या जात होती. रेडिमेड हार ५०० रुपये जोडीनुसार मिळत होते, अशी माहिती बबलूशेठ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com