esakal | लालचंद ज्वेलर्सला गंडा, कारागिराने हडपले ४० लाखांचे सोने
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीतील व्यापाऱ्यांना ९२ लाखांचा गंडा

मी सध्या राजस्थानला आहे. पुढे लॉकडाउन लागेल त्यामुळे मी राजस्थानला आलो आहे, मी औरंगाबादला आल्यानंतर शिल्लक सोन्याचा हिशेब करू असे त्याने सांगितले.

लालचंद ज्वेलर्सला गंडा, कारागिराने हडपले ४० लाखांचे सोने

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : सोने Gold घडविण्याच्या कामातून ज्वेलर्स मालकाशी विश्वासाचे नाते तयार झाल्यानंतर एका बड्या कारागिराने तब्बल ८४ तोळे सोने हडप करून ४० लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लालचंद ज्वेलर्स अँड सन्सचे Lalchand Jewellers And Sons उदय सोनी यांच्या तक्रारीवरून एजंटाविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरचंद प्रेमराज सोनी (रा. पानदरिबा, अप्पा हलवाईसमोर) असे त्या आरोपी कारागीर एजंटचे नाव आहे. या प्रकरणी सराफा व्यावसायिक उदय हरिदास सोनी (४२, वामन हरी पेठेच्या पाठीमागे, समर्थनगर) Aurangabad यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे लालचंद मंगलदास सोनी जेम्स अँड ज्वेलर्स प्रा.लि. (एलएमएस) नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते सोने-चांदीचे अलंकार मागणीनुसार बनवून (घडवून) विक्री करतात. अमरचंद सोनीचे वडीलही सोने घडविण्याचे काम करीत असत. १९९४ पासून अमरचंद हा सोने घडविण्याचे काम करत होता. त्यामुळे संबंधित सराफा व्यावसायिकाचा त्याच्यावर विश्वास होता. ग्राहकाच्या मागणीनुसार सोन्याचे दागिने अमरचंद याच्याकडून बनवून आल्यानंतर व्हाऊचरद्वारे ताब्यात घेऊन अमरचंद याला मजुरी दिली जात होती, तर उरलेले सोने त्याच्याकडेच ठेवले जात होते.Artisan Cheated 40 Lack Gold To Lalchand Jewellers In Aurangabad

हेही वाचा: मुलांनो! आई-बाबांसाठी घरी परता, एकटेपणा छळतोय त्यांना

विश्वासाच्या नात्याला गेला तडा

मार्च २०२१ मध्ये अमरचंद सोनी याला उदय सोनी यांनी उरलेल्या सोन्याचा हिशेब करण्यासाठी बोलावले असता, ‘मी सध्या राजस्थानला आहे. पुढे लॉकडाउन लागेल त्यामुळे मी राजस्थानला आलो आहे, मी औरंगाबादला आल्यानंतर शिल्लक सोन्याचा हिशेब करू असे त्याने सांगितले. लॉकडाउनमुळे उदय यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला. मे महिन्यात संपर्क केल्यानंतरही त्याने तसेच उत्तर दिले. त्यानंतर प्रत्येक वेळेस तो टाळाटाळ करू लागला. दरम्यान उदय यांनी ५ जून रोजी स्वतःच हिशेब केला असता १ एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ या कालावधीत ३.२७९ किलो ४९० मिलिग्रॅम सोने त्याच्याकडे दिले गेले होते. त्यातून अमरचंद याने २.४३३ किलो ५९० मिलिग्रॅम इतक्या वजनाच्या सोन्याचे दागिने बनवून दिले आणि उर्वरित आजच्या बाजारमूल्यानुसार ४० लाख १८ हजार रुपयांचे ८४५ ग्रॅम ९०० मिलिग्रॅम वजनाचे सोने त्याच्याकडेच ठेवून घेतल्याचा प्रकार समोर आला.

हेही वाचा: 'भगवान रामचा वापर केवळ राजकीय व वैयक्तिक स्वार्थासाठी'

मी कर्जबाजारी झालो, तुमचे सोने विकले

अनलॉक झाल्यानंतर अमरचंद औरंगाबादला आल्यानंतर ज्वेलर्स मालकाने त्याच्याशी संपर्क केला असता, त्याने सांगितले की, ‘मी कर्जबाजारी झालो असून मी तुमच्या सोन्याची विक्री केली आहे. आता माझ्याकडे काहीच सोने नाही, मला इतरांचे देणे असल्याने मी सोने विकून त्यांना पैसे दिले आहेत’ असे सांगितले. दरम्यान, ज्वेलर्स मालक उदय सोनी यांच्यावर गंभीर आजाराची शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर उदय सोनी यांनी तक्रार दिल्‍याची माहिती क्रांती चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली. आरोपी अमरचंद सोनीविरोधात उपनिरीक्षक महादेव गायकवाड यांनी नोंद गुन्हा केल्याचीही माहिती डॉ. दराडे यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.

loading image