
अकबरुद्दीन ओवैसींनी घेतलं औरंगजेबच्या कबरीचं दर्शन; वादाची शक्यता
औरंगाबाद : एमआयएमचे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्यासोबत यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.
(Akbaruddin Owaisi in Aurangabad News)
एमआयएमचे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याची सुरूवात त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, वारिस पठाण हेही उपस्थित होते. त्यांच्या या दर्शनानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे.
हेही वाचा: अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते, मुस्लीमही आधी हिंदू होते: रामदास आठवले
दरम्यान तेलंगणाचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी हे औरंगाबादमधील एका महिला शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आले असून खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, "आज ते एका चांगल्या उपक्रमासाठी आलेले आहेत. आम्ही जे काम केलेले आहेत अशा घोषणा दुसऱ्या पक्षानेसुद्धा कराव्यात." असं जलील बोलताना म्हणाले.
"खुल्ताबादमध्ये खूप मोठेमोठे दर्गे आहेत. त्यांना मोठा इतिहास लाभलेला आहे. तिथे कुणीही गेलं तर त्या कबरीचं दर्शन घेतं त्यामुळे त्यामध्ये वेगळा अर्थ काढू नये." असं जलील बोलताना म्हणाले. आता सगळे रंग आमचे झाले आहेत असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: 'उद्धवा दिलेली स्क्रिप्ट नीट पाठांतर कर'; भाजपनं पवारांसोबत शेअर केलं व्यंगचित्र
दरम्यान याप्रकरणी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, "औरंगजेबाने प्रजेला खूप त्रास दिला आहे. त्याने हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. खुल्ताबादच्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी जात नाही पण हे लोकं राजकारण करण्यासाठी तिथे गेले आहेत." असा आरोप खैरे यांनी केला आहे.
Web Title: Asaduddin Owaisi Aurangabad Aurangjeb Visit To The Tomb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..