

Asian Hospital Fire
esakal
छत्रपती संभाजीनगर: ‘‘मी नेहमीप्रमाणे ड्यूटी करत होते. कोणत्या बाळाला काय पाहिजे, काय नाही, ही सर्व कामं सुरू होती. अचानक काही सहकारी ‘एनआयसीयू’तल्या कोपऱ्याकडे धावताना दिसले. बघते तर काय? तिथं धूर निघत होता! तो बघेपर्यंत ठिणगी पडली अन् लगेच एसीला आग लागली. मग क्षणभर मीही घाबरले, पण वेळीच सावरून सहकाऱ्यांच्या मदतीनं लेकरांना ‘एनआयीसू’च्या बाहेर काढलं. मनात भीती, घाबरलेपणानं हातपाय गळून गेलं व्हतं, पण जिवाची बाजी लावली आणि बाळांचा जीव वाचला. ‘मलाही तीन लेकरं आहेत, आई म्हणून मला एकच माहिती होतं, ती नऊही मुलं माझीयेत, त्यांना मला बाहेर काढायचंय...’