Sambhaji Nagar : टाकाऊ कपड्यांच्या फेरवापरावर संशोधन ; बालवैज्ञानिक अथर्व बेळकोणीकर

टीसीएच ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सहावीतील बालवैज्ञानिक अथर्व प्रवीण बेळकोणीकर याने ‘जुन्या टाकाऊ कपड्यांचा फेरवापर’ आणि ‘जुन्या टाकाऊ कपड्यांमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन करून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : टीसीएच ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सहावीतील बालवैज्ञानिक अथर्व प्रवीण बेळकोणीकर याने ‘जुन्या टाकाऊ कपड्यांचा फेरवापर’ आणि ‘जुन्या टाकाऊ कपड्यांमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन करून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. कमी वयात पर्यावरणासारख्या विषयात संशोधन व जनजागृती करणाऱ्या अथर्वचे कौतुक होत आहे.

अथर्व हा डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या पहिल्या दोन्ही फेऱ्या पूर्ण करून तिसऱ्या फेरीसाठी संशोधन प्रबंधाची तयारी करत आहे. पाश्चात्त्यांचे अनुकरण करीत तरुणाई कपड्यांची अनिर्बंध खरेदी करतात. त्यातील बहुतांश कपडे न वापरताच फेकून दिले जातात. त्याचा पर्यावरणावर परिणाम होत असल्याची जाणीव अथर्व नागरिकांना करून देत आहे. तसेच जुन्या कपड्यांच्या बाजारात जाऊन त्याचा पुनर्वापर कसा केला जाऊ शकतो, हे त्याने विक्रेते, खरेदीदारांना समजावून सांगितले.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar Crime News : घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास ; नारेगाव, भाट गल्ली येथील घटना

तसेच मनपाच्या कचरा डेपोमध्ये जाऊन तेथे टाकून दिलेल्या कपड्यांचा पुनर्वापर कसा करता येईल यावर अभ्यास केला. त्यासाठी जुन्या कपड्यांपासून विविध वस्तू बनवणाऱ्यांच्या भेटी घेतल्या. टाकाऊ कपड्यांपासून पर्यावरणाची हानी थांबवणे गरजेचे आहे. त्यामुळे भरमसाट कपडे खरेदी न करता त्याच कपड्यांचा पुनर्वापर केला तर पर्यावरणाची हानी टळू शकते, याबाबत अथर्वने जनजागृती सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com