Atul Save : सत्ताधारी असताना खैरे यांनी काय केले? गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांचा प्रश्‍न

समांतर रद्द झाल्यानंतर शहरासाठी तातडीने नव्याने योजना होणे गरजेचे होते
Atul Save criticize what did Khire do when he was in power water supply scheme
Atul Save criticize what did Khire do when he was in power water supply schemeesakal

छत्रपती संभाजीनगर : समांतर योजनेविषयी अनेक वाद होते. त्या वादात योजना बंद पडली. मात्र, त्यानंतर नव्या योजनेसाठी प्रयत्न झाले नाहीत. मी उद्योगमंत्री असताना केवळ ५५ दिवसांमध्ये १,६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना शहरासाठी मंजूर करून घेतली. सत्तेत असताना खैरेंनी पाणी योजनेसाठी काय केले? असा प्रश्‍न गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी केला.

समांतर रद्द झाल्यानंतर शहरासाठी तातडीने नव्याने योजना होणे गरजेचे होते. राज्याचे उद्योगमंत्रिपद माझ्याकडे आले व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी विनंती केली, योजना मंजूर होईपर्यंत मी सत्कारही स्वीकारला नाही आणि केवळ ५५ दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी १६८० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली, पण शहराचे दुर्दैवाचे की, राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांनी टक्केवारीसाठी अडीच वर्षे या योजनेची निविदा प्रक्रिया थांबून ठेवली.

त्यामुळे शहराचे नुकसान झाले. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले व योजनेच्या कामाने गती घेतली. ५५ टाक्या बांधण्यासह अंतर्गत पाइपलाइनचे काम जोमाने सुरू असून, डिसेंबर २०२४ मध्ये नागरिकांना मुबलक पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. खैरेंनी शहराच्या पाण्यासाठी काय केले? याचे उत्तर नागरिकांना द्यावे, असेही आव्हानही सावेंनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com