

Aurala Temple Cleaning
esakal
कन्नड: दैनिक ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘चला, मंदिरे स्वच्छ करूया!’ या विशेष अभियानाअंतर्गत तालुक्यातील औराळा येथील हर हर महादेव भक्त परिवार आणि ग्रामस्थांतर्फे सोमवारी (ता. ३१) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शहीद सुनील जाधव यांच्या स्मारक परिसर व रेणुका माता मंदिरासमोरील दोन एकरचा संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला.