औरंगाबादेत बालकांसाठी होणार शंभर बेडचे कोविड रुग्णालय

तिसऱ्या लाटेसाठी तयारी; प्रशासकांच्या सूचना
covid 19 center
covid 19 centercovid 19 center

औरंगाबाद: कोरोना संसर्गाची (covid 19 infection) तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यात लहान मुलांना संसर्ग होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने तयारी सुरू केली आहे. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. सात) शहरातील डॉक्टरांची बैठक घेत महापालिकेतर्फे १०० बेड्सचे बाल कोविड रुग्णालय उभारण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेचे प्रशासक श्री. पांडेय यांच्या दालनात शुक्रवारी शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची बैठक झाली. यावेळी कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट व त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा झाली. त्यानंतर श्री. पांडेय यांनी बालकांसंदर्भातील कोरोना संसर्गाचे वेळीच नियोजन करून सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे १०० बेड्सचे विशेष कोविड बाल रुग्णालय सुरू करावे, तसेच महापालिकेच्या सिडको एन-८ रुग्णालयात कोविड गरोदर मातांना औषधोपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना आरोग्य विभागाला केल्या.

covid 19 center
मराठवाड्यातील मोठ्या धरणांत ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक

बैठकीला महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, बाल रोगज्तज्ञ डॉ. नवागिरकर, डॉ. बालकृष्ण राठोडकर, डॉ. उज्वला भामरे, डॉ. मेघा जोगदंड, डॉ. मनोज बजाज, डॉ. सावरे, डॉ. लीना सोना, डॉ. शैलेजा ताठे, डॉ. स्मिता नळगिरकर, डॉ. श्याम खंडेलवाले, डॉ. संध्या कोंडपल्ले, डॉ. प्रभा खैरे, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. रेणू बोराळकर, डॉ. अमित पिलखाने, डॉ. निखील पाठक, डॉ.अभिजित जोशी, डॉ. सागर कुलकर्णी, डॉ. प्रशांत चव्हाण. डॉ. सचिन खबयते व डॉ. हशीब यांची उपस्थिती होती.

आठ टक्के बालकांमध्ये सौम्य लक्षणे
बालकांसाठी कशा पद्धतीने नियोजन करावे लागेल, याविषयी श्री. पांडेय यांनी डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली. डॉक्टरांनी सांगितले की, आठ ते दहा टक्के बालकांमध्ये सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. ह्रदयासंबधी आजार, इतर आजार असलेल्या बालकांना कोरोना झाल्यास ते गंभीर होतील.

covid 19 center
Corona Update: राज्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत घट

डॉक्टरांना देणार प्रशिक्षण
शहरात किती बाल रुग्णालये आहेत. किती बाल रोगतज्ज्ञ आहेत, कोणत्या बाल रुग्णालयांत बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करता येतील, किती डॉक्टर तसेच औषध व साहित्य लागेल, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही श्री. पांडेय यांनी आरोग्य विभागाला दिल्या. महापालिकेच्या डॉक्टरांना घाटी व खासगी रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com