esakal | अतिवृष्टीमुळे १०५ कोटींचे नुकसान Iaurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे १०५ कोटींचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद ः शहरात सातत्याने ढगफुटीच्या वेगाने पाऊस होत आहे. त्यामुळे रस्ते, पूल, नागरिकांच्या घरात, व्यापाऱ्यांच्या दुकानात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान होत आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात तब्बल १०४ कोटी ९७ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे, असा अहवाल शनिवारी (ता. नऊ) महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत सादर केला.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

शहर परिसरात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. वारंवार ढगफुटीच्या वेगाने पाऊस झाल्याने खाम, सुखना नदीसह नाल्यांना पूर आल्याने संरक्षक भिंती पडल्या, नाल्यात कचरा साचला, रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले, काही भागात रस्ते वाहून गेले, रस्ते खरडून गेले. पुलांचे नुकसान झाले. तसेच महापालिका इमारतीच्या परिसरात झाडे पडून मोठे नुकसान झाले. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अहवाल तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शनिवारी शहरातील नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला. महापालिकेच्या इमारती, आरोग्य केंद्र, सामाजिक सभागृह अशा ८६ ठिकाणी नुकसान झाले आहे. शहरात ८६ कामांसाठी १०४ कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी राज्य सरकारकडून महापालिकेला मिळावा अशी मागणी श्री. पांडेय यांनी अजित पवार यांच्याकडे केली.

शहरात परिसरातील भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांना व पुलांना फटका बसला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार १४ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०.७० कोटी, १८ रस्त्यांच्या कामांसाठी ६७.२३ कोटींचा निधी लागणार आहे. १७ नाल्यांच्या कामांकरिता १८.८५ कोटी व ४१ इमारत दुरुस्तीला ८.१९ कोटी रुपयाचा निधीची गरज असल्याचे अहवालात नमूद आहे.

प्रभाग कामे निधी (कोटी)

  • एक ११ ०८.००

  • दोन ०३ ०२.५०

  • तीन १० १०.६०

  • चार ११ २२.०२

  • पाच ०७ ०३.०७

  • सहा ०९ ०५.९०

  • सात ०९ २६.१०

  • आठ १६ १४.१०

  • नऊ १० १२.६८

  • एकूण ८६ १०४.९७

loading image
go to top