esakal | औरंगाबाद : गांधीनगरात तरुणाने घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad

औरंगाबाद : गांधीनगरात तरुणाने घेतला गळफास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गांधीनगर (GandhiNagar) परिसरातील १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडली. रितेश राजेश कागडा (१९, रा.गांधीनगर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

रितेशचे दहावी पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. काही दिवसांपासून तो मजुरी काम करत होता. मात्र मध्यंतरी तो व्यसनाच्या आहारी गेला होता. बुधवारी सकाळी कामाला जाऊन सायंकाळी तो घरी आला. यावेळी घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना रितेशने स्वयंपाकघराचे दार आतून लावून फॅनच्या हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ झाल्याने रितेश दिसत नसल्याने घरातील लोकांनी त्याला आवाज दिला.

हेही वाचा: पिंपरी ; गरीब घरातील मुलांसाठी ऑनलाइन गुरू’ ॲप

मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दरवाजा तोडला असता, रितेशने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. क्रांतीचौक पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

loading image
go to top