esakal | थरार! जीवापेक्षा पेट्रोल पडले महागात, पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावरुन गेला ऊसाचा ट्रॅक्टर
sakal

बोलून बातमी शोधा

Kannad Accident News Kachru Chavan

त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिस कर्मचारी कचरू वामन चव्हाण यांना मृत घोषित केले.

थरार! जीवापेक्षा पेट्रोल पडले महागात, पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावरुन गेला ऊसाचा ट्रॅक्टर

sakal_logo
By
राजेंद्र भोसले

कन्नड (जि.औरंगाबाद) : ऊसाने भरलेले ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने कन्नड उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी कचरू चव्हाण यांचा मृत्यू झाला. कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील कन्नडपासून जवळच असलेल्या मकरनपूर पुलाजवळ गुरुवारी (ता.२५) संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान उसाने भरलेला ट्रॅक्टर बारामती कारखान्याकडे जात असतांना कन्नडहुन पोलिस कर्मचारी कचरू वामनराव चव्हाण (वय ५२) हे मोटारसायकलवर पेट्रोल पम्पवर पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना हा अपघात झाला.

वाचा - आईवडिलांची परिस्थिती पाहवत नसल्याने वैशालीने उचले टोकाचे पाऊल, लग्नाचे स्वप्न राहिले अधूरे

या अपघातात उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक कचरू वामनराव चव्हाण यांच्या पोटावरून  गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिस कर्मचारी कचरू वामन चव्हाण यांना मृत घोषित केले. दरम्यान या अपघातात प्रकरणी ट्रॅक्टर चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top