Aurangabad Crime : फक्त दहा रुपयांसाठी रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव

प्रवाशाच्या नाकावर जोरात ठोसा मारल्याने प्रवाशाचा उपचारादरम्यान जीव गेल्याचा प्रकार समोर आला.
murder case
murder casesakal

औरंगाबाद : सासरवाडीहून परतणाऱ्या प्रवाशासोबत रिक्षाचालकाने रिक्षाभाड्यासाठी भांडण करत प्रवाशाला जबर मारहाण केली. प्रवाशाच्या नाकावर जोरात ठोसा मारल्याने प्रवाशाचा उपचारादरम्यान जीव गेल्याचा प्रकार समोर आला. ही घटना मंगळवारी (ता.१४) सायंकाळी कामाक्षी चौकात घडली होती. या प्रकरणी प्रवाशाचा जीव घेणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी (Police) बुधवारी (ता.१५) पहाटे बेड्या ठोकल्या असून बाबा सुलेमान बावजीर ऊर्फ सालम बीन आलम (५० रा. चेलीपुरा, मुर्गीनाला परिसर) असे त्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे, तर मिर्झा मुझफ्फर हुसेन मिर्झा अली हुसेन (५०, रा. सईदा कॉलनी, अंबरहिल) असे त्या मृत प्रवाशाचे नाव आहे. आरोपी रिक्षाचालकाला अटक करून (Crime In Aurangabad) न्यायालयात हजर करण्यात आले असता, रिक्षाचालक आरोपी सालम बीन याला गुरुवारपर्यंत (ता.१६) पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी दिले. (Aurangabad Crime News Autorickshaw Driver Kills Passenger For Ten Rupees)

murder case
Aurangabad|भरस्त्यात पोलिसाचा दोरीने आवळला गळा, औरंगाबादेत खळबळ

या प्रकरणात सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी काम पाहिले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मुंढे करीत आहेत. या प्रकरणात मृत मिर्झा यांचा पुतण्‍या मिर्झा हुसेन मिर्झा तकी हुसेन (३२, रा. देवडी बाजार, सिटी चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत मिर्झा मुझफ्फर हे देखील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. १५ दिवसांपूर्वी मिर्झा मुझफ्फर यांची रिक्षा खराब झाली होती, त्‍यामुळे ते मिळेल ते काम करीत होते.

murder case
धक्कादायक! महिनाभरात वानरांनी घेतला २५० कुत्र्यांच्या पिलांचा जीव

दहा रुपयांमुळे घेतला जीव
मृत मिर्झा मुझफ्फर हे आरोपी सालम बिन याच्‍या रिक्षातून (एमएच-२०-ईएफ-००१३) कामाक्षी चौकात सायंकाळी उतरले. त्‍यानंतर त्‍यांच्‍यात रिक्षाच्‍या भाड्यावरुन वाद झाला. आरोपीने भाड्याच्‍या दरापेक्षा वाजवी दहा रुपये जास्‍त मागितले. मात्र मृत मिर्झा मुझफ्फर यांनी ते देण्‍यास नकार दिला. त्‍यानंतर त्‍यांच्‍यात झटापट झाली. आरोपी रिक्षा चालकाने मिर्झा मुझफ्फर यांना हाताच्‍या कोपऱ्याने व डोक्याने नाकावर मारले. त्‍यानंतर मुझफ्फर ‍यांच्‍या नाकातून मोठ्या प्रमाणातून रक्त येत होते. त्‍यानंतर मिर्झा मुझफ्फर व ताहेर हुसेन यांनी रिक्षा चालकाविरुध्‍द तक्रार देण्‍यासाठी सिटी चौक पोलिस ठाणे गाठले. दरम्यान, पोलिसांनी मुझफ्फर यांना घाटीत उपचारासाठी जाण्यास सांगितले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com