esakal | Aurangabad Rain Updates : औरंगाबादेत जोरदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबादेत रात्री उशीरापर्यंत जोरदार पाऊस झाला.

Aurangabad Rain Updates : औरंगाबादेत जोरदार पाऊस

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : दोन ते तीन दिवसांपासून अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने Rain सोमवारी (ता.१२) शहर Aurangabad व परिसरात रात्री उशिरापर्यंत चांगलीच बॅटिंग केली. सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत सुरु होता. रात्री १० वाजेपर्यंत २८ मिलिमिटर पावसाची नोंद एमजीएमच्या वेधशाळेत झाली. दरम्यान, खंडपीठाच्या अलीकडील परिसरात या पावसाने मोठे झाड कोसळले होते. सोमवारी शहरात सायंकाळी सहानंतर पावसाला सुरुवात झाली. यात शहरातील सर्वच भागात कमी-जास्त प्रमाणात हा पाऊस होता. सुरवातीला ब्रेक घेत घेत सुरू झालेल्या पावसाने उशीरापर्यंत दमदार बॅटींग केली.aurangabad rain updates heavy rain hit city

हेही वाचा: Aurangabad: पिकांमध्ये निलगायींचे धुडगूस, शेतकऱ्यांमध्ये दहशत

त्यामुळे शहरातील नाल्याशेजारी राहणाऱ्यांच्या घरात पाणी शिरले होते. जवळपास महिनाभरापासून पाऊस गायब झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पुन्हा आगमन झाले. तेही केवळ भुरभुर होत होती. सोमवारी मात्र पावसाचा जोर चांगलाच वाढला. सर्वच भागात हा पाऊस झाला. रविवारी दिवसभरात १२ मिलिमीटरची नोंद झाली होती. आगमी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यताही एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक तथा हवामानाचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

loading image