esakal | कधी न झुकला, कधी न हरला महाराष्ट्र माझा : कलाशिक्षकाचा रांगोळीतून अनोखा संदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील विनायकराव पाटील प्राथमिक शाळेतील कला शिक्षक राजेंद्र नरसु वाळके यांनी कोरोनाला हरविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांपासून डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकर्मी आदींविषयी आकर्षक अशी रांगोळी रेखाटून सर्व यंत्रणेला सलाम केला

कधी न झुकला, कधी न हरला महाराष्ट्र माझा : कलाशिक्षकाचा रांगोळीतून अनोखा संदेश

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : राकट, कणखर, शूर महाराष्ट्र अगदी शिवरायांच्या काळापासून अनेक संकटांचा, आक्रमणांचा यशस्वी सामना करत आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील विनायकराव पाटील प्राथमिक शाळेतील कला शिक्षक राजेंद्र नरसु वाळके यांनी कोरोनाला हरविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांपासून डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकर्मी आदींविषयी आकर्षक अशी रांगोळी रेखाटून सर्व यंत्रणेला सलाम केला

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

कोरोनाच्या या महायुद्धात समस्त महाराष्ट्र आपल्या सोबतीला असल्याचा आत्मविश्वासही या रांगोळीतून दिला आहे. शिवरायांनी आपल्या युद्धनीतीच्या जोरावर, प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर, आपल्या मावळ्यांच्या साथीने रयतेचे राज्य निर्माण केले. संतांनी आपल्या प्रबोधनाने इथल्या माणसांची मन बळकट केली. संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, संत एकनाथ, राष्ट्रसंत तुकाराम महाराज ही मंडळीही कोणत्याही संकटाला डगमगलीच नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनीही जिंकलाच, की अज्ञानाविरुद्ध लढा! यशवंतराव चव्हाण यांनी देखील मोठया विपरीत परिस्थितीतही हा आधुनिक महाराष्ट्र घडविलाच की!

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

आज कोरोनासारखे संकट महाराष्ट्रासमोर डोळे वटारून उभे आहे. या कोरोनारुपी संकटाला आपण नक्कीच हरवणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सर्व राज्यातील विविध विभागातील यंत्रणा, तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाकर्मी अहोरात्र काम करत आहेत. या लढ्यात तुम्ही एकटे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबतीला आहे, अशा आशयाची राजेंद्र वाळके यांनी रेखाटलेली ही रांगोळी अबोल असूनही कोरोना योध्यांचा आत्मविश्वास बाळावणारी आहे.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

कोरोनाच्या या लढ्यात आपल्या जीवाचे रान करून काम करणारे डॉक्टर, नर्स, पोलीस, पत्रकार, सफाई कामगार यांच्याविषयी रांगोळीच्या माध्यमातून राजेंद्र वाळके यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबई येथे अनेक पत्रकारांना कोरोनाची झाल्याचे स्पष्ट झाले. आपल्याला खरी माहिती कळावी, म्हणून पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य करतात. ही रांगोळी तयार करण्यासाठी राजेंद्र वाळके यांना तब्बल 14 तास वेळ लागला, असा दावा त्यांनी 'सकाळ'शी बोलतांना केला आहे.

loading image