औरंगाबाद : ठाकरे सरकार जाताच निघाली बाळासाहेबांच्या पुतळ्याची निविदा!

महापालिका : ९.७० कोटींचे अंदाजपत्रक
Aurangabad muncipal corporation
Aurangabad muncipal corporationsakal

औरंगाबाद : महापालिकेने सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतिवन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील संरक्षक भिंत व पुतळ्यासाठी लागणारा चबुतरा तयार करण्याचे काम सुरू आहे. आता शिवसेनाप्रमुखांचा भव्य पूर्णाकृती पुतळा व गॅलरीतील विविध कामे करण्यासाठी ९.७० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

स्मारक व स्मृतिवन विकसित करण्यासाठी राज्य शासनाने २५.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र हा निधी कमी पडत असल्याने पुन्हा ९.७० कोटींचा अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने स्मृतिवनच्या संरक्षण भिंतींचे काम पूर्ण केले असून, परिसरात सुमारे सहा हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे.

त्यासोबतच पहिल्या टप्प्यातील अंतर्गत रस्ते व इतर सिव्हिलची काम पूर्ण होत आहेत. शिवसेनाप्रमुखांचा भव्य पूर्णाकृती पुतळा नवीन तंत्रज्ञानावर आधारित जीआरएसमध्ये बनवला जाणार आहे. पुतळा ५१ फूट उंचीचा असेल. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात जीआरएसमध्ये पुतळा तयार करणे तसेच आर्ट गॅलरी, साउंड सिस्टीम, चित्रफीत, इंटेरियर सुशोभीकरण, पुतळा परिसरात लाइट सिस्टीम, यासह इतर कामे करण्यासाठीची निविदा एक जुलैला प्रसिद्ध करण्यात आली आहे. २५ जुलै ही निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख असून, २८ जुलैला निविदा उघडली जाणार आहे. १५ जुलैला निविदा भरण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राटदारांची प्रि-बिड बैठक होणार असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com