esakal | औरंगाबादेत आणखी एक कोरोना पॉझिटीव्ह , बाधितांची संख्या अठरावर 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गंभीर बाब म्हणजे औरंगाबादेत जलाल कॉलनी, आरेफ कॉलनी, किराडपुरा या भागांमध्ये एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. हे रुग्ण एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. अर्थातच नातलगांशी संबंध येत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे यावरून दिसून आले आहे. 

औरंगाबादेत आणखी एक कोरोना पॉझिटीव्ह , बाधितांची संख्या अठरावर 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - औरंगाबादेत आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असून हा ४९ वर्षीय रुग्ण किराडपुरा येथील मुलाचे वडील आहेत. मुलाकडून त्यांना लागण झाली असून आता औरंगाबादेत कोरोना बाधितांची संख्या अठरावर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ‘सकाळ' शी बोलताना दिली.
 
औरंगाबाद शहरात आतापर्यंत कोरोना (कोवीड-१९) चे सतरा रुग्ण सापडले आहेत. परंतु आता किराडपुरा येथील बाधित मुलाच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

गंभीर बाब म्हणजे औरंगाबादेत जलाल कॉलनी, आरेफ कॉलनी, किराडपुरा या भागांमध्ये एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. हे रुग्ण एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. अर्थातच नातलगांशी संबंध येत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे यावरून दिसून आले आहे. 

कोरोनाचा औरंगाबादेत धोका वाढला आहे. मंगळवारी (ता. सात) तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील दोघांसह किराडपुऱ्यातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली. त्या मुलाच्या वडीलांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबाधितांची संख्या आता अठरावर गेली आहे. यात पूर्णपणे बरी झालेल्या महिलेला घरी पाठविण्यात आले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता सोळा जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एका मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

४० जणांचे अहवाल निगेटिव्ह
डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले की कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यापैकी ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 
 

loading image