आठवडाभरातच कोरोनाने आईनंतर मुलाचा मृत्यू; रुग्णालयात मुलं, सुनांवर उपचार सुरु

म्हणतात ना सर्व दिवस सारखे नसतात... तसे दिवस पालटले. उकिरड्याच्या दैना फिटल्या... शेती बागायती झाली.... व्यवसायातुन दोन पैसे मागे पडु लागले.घरांत काळवंडलेल्या परिस्थितीतून सुख लोळण घेऊ लागले.
Aurangabad Corona News
Aurangabad Corona News

पाचोड (जि.औरंगाबाद) : प्रतिकुल परिस्थितीला झगडत कष्टातून जेव्हा दिवस पालटले तेव्हा कोरोनाने घरातील दोन कर्त्या मायलेकास बारा सदस्यीय कुटूंबातून हिरावून नेल्याने अवघे कुटुंबच पोरके झाले आहे. त्यांच्यावर आठ दिवसांपासुन रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. ही हृदयद्रावक घटना थेरगाव (ता.पैठण) येथे शुक्रवारी (ता.२३) घडली. थेरगाव (ता.पैठण) येथील यमुनाबाई फक्कडराव नेहाले (वय ६५) या काकू म्हणुन सर्वपरिचित. घरी तीन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा डझनभर लोकांचा परिवार. मुली विवाह होऊन सासरी गेल्या. यमुनाबाईच्या पतीचे काही वर्षांपूर्वी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सर्वात मोठा मुलगा सुनिल नेहाले (वय ४९), दुसरा अनिल तर तिसरा गणेश नेहाले. सुनिल घरात सर्वात मोठे असल्याने व वडीलांचे छत्र हरवल्याने आई यमुनाबाई व सुनिल यांच्यावर कुंटुबाची जबाबदारी पडली. सुनिल हे एका पायाने दिव्यांग होते. त्यामुळे त्यांनी पाचोड (ता.पैठण) येथे भांडयाचे दुकान टाकले, तर आई यमुनाबाई यांनी फाटलेल्या संसाराला हात देण्यासाठी गावोगावी डोक्यावर बांगडया नेऊन त्या महिलांना भरून त्यातून दोन पैसे वाचवत.

Aurangabad Corona News
जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

तसे दुसरे दोन्ही मुले अनिल व गणेशही व्यवसायात उतरले. म्हणतात ना सर्व दिवस सारखे नसतात... तसे दिवस पालटले. उकिरड्याच्या दैना फिटल्या... शेती बागायती झाली.... व्यवसायातुन दोन पैसे मागे पडु लागले.घरांत काळवंडलेल्या परिस्थितीतून सुख लोळण घेऊ लागले. अन् गतवर्षापासून कोरोनाने व्यवसायाला ग्रहण लावले. कोरोनाच्या भितीपोटी सर्वजण काळजी घेऊ लागले. मात्र या कुंटुबाला दृष्ट लागली. मागील आठवड्यात बुधवारी (ता.१८) सर्व कुंटुबीय कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह आल्याने सर्व जण औरंगाबाद येथे वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. उपचार सुरु असताना शुक्रवारी (ता.16) यमुनाबाईचे निधन झाले. कुणाला काही एक न सांगता अंत्यसंस्कार उरकण्यात आले. अन् या घटनेला आठवडा उलटत नाही तोच शुक्रवारी (ता.२३) सुनिल नेहाले ही मरण पावले. आठवडाभरात कुटुंब प्रमुख मायलेकाने जगाचा निरोप घेतल्याची बातमी गावांत समजताच अवघे गाव हळहळले. सर्वानी आपापले दुकान, उद्योग व्यवसाय बंद करुन कोरोनाची मनोमनधास्ती घेतली. ग्रामस्थांनी स्वयंफुर्तीने पुढे येत आरोग्य विभागाला बोलावून अँटीजेन तपासण्या केल्या. तपासण्यासाठी रांगा लागल्या. प्रत्येकाला आपल्या वरील संकटाची जाणीव होत आहे. प्रथमतः गेवराई मर्दा येथील मुख्याधापक हनिफखॉ पठाण यांच्या कुंटुबाच्या ऱ्हासानंतर नेहाले कुटुंबावर संक्रांत कोसळली. मायलेकाने दम तोडून जगाचा निरोप घेतला, तर त्यांचे कटूबातील इतर सर्व सदस्य रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांना ही घटना समजू नये म्हणून नातेवाईक पूर्णत: काळजी घेत आहे.

Aurangabad Corona News
उमरग्यात २३ दिवसांत ६१ जणांचा मृत्यु, स्मशानभूमीत जागा पुरेना!

कोरोनाने सर्वकाही हिरावले

कोरोनामुळे भयावह परिस्थिती गावोगावी उद्भवली आहे. दररोज परिसरात मृत्यू होऊन अनेकजण अनाथ होत आहे. ज्याच्या खांद्यावर जायचे अशांना स्वतःच्या खांद्यावरही नेता आले नाही. जवळच्या नात्यातील अनेक जण असूनही बेवारशी असल्याप्रमाणे सरणाचा आधार घ्यावा लागत आहे, मृतांवर परंपरागत अंत्यसंस्कारही करता येईना. इच्छा असूनही जवळची माणसे मृत कुटुंबातील व्यक्तीच्या सांत्वनाला, भेटीला जाऊ शकत नाहीत, अनेकांना मृत व्यक्तिचे अंत्यदर्शनही घेता येईना. कोरोनामुळे अनेकजण अगदी बेवारसासमान जात आहे. त्यांच्या पार्थिवावर डोकं ठेवून कोणीही निरोपाचा हंबरडा फोडण्यास तयार नाही. अखेरची सोबत देण्यासाठी जवळच्या चार लोकांचा खांदाही त्यांना लाभेना. सदैव गर्दीत रमलेल्या काहींना शेवटचा निरोप द्यायला पोटची पोरंही येऊ शकली नाहीत. आयुष्यभर कर्मठपणे कर्मकांड कवटाळणाऱ्या अनेकांच्या तोंडात अखेरच्या क्षणी पाण्याचा एक घोटही विधिवत पडेना. कोणी पुढे न आल्याने स्थानिक यंत्रणेला त्यांची परस्पर विल्हेवाट लावावी लागत आहे. सर्वासाठी हे सारं अनुभव विलक्षण वेदनादायी असून सख्ख्या मुलाला आपल्या जन्मदात्यांना अग्नी देता येईना. कुणीतरी त्रयस्थाच्या हस्ते अग्नीसंस्कार उरकण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com