esakal | पैठण तालुक्यातील चितेगाव, पांगरा, जांभळीत जोरदार पाऊस, पिकांचे नुकसान

बोलून बातमी शोधा

null
पैठण तालुक्यातील चितेगाव, पांगरा, जांभळीत जोरदार पाऊस; पिकांचे नुकसान
sakal_logo
By
परमेश्वर कोकाटे

चितेगाव (जि.औरंगाबाद) : चितेगाव (ता.पैठण) येथे मेघगर्जेनेसह बुधवारी (ता.२८) दुपारी सव्वाचारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे ग्रामस्थांना उकड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे. परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावर होते. बुधवार दुपारी सव्वा चारच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जेनेसह पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना उकड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानत वाढ झाल्याने उकडा जा़णवत होता.

हेही वाचा: Breaking News| औरंगाबाद महापालिकेच्या स्टोअरमधून 48 Remdesivir इंजेक्शन चोरी

चितेगावसह परिसरातील पांगरा, जांभळी, जळगाव परिसरात बुधवारी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांचे उन्हाळी कांदा, बाजरी, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे या पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. उघड्यावर ठेवलेले हरभरा, तुरीचे भुस व ज्वारीच्या पेड्या भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे.