esakal | ऑक्सिजनअभावी पैठण एमआयडीसीमधील कंपनी बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजनअभावी पैठण एमआयडीसीमधील कंपनी बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ
ऑक्सिजनअभावी पैठण एमआयडीसीमधील कंपनी बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ
sakal_logo
By
गजानन आवारे

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण एमआयडीसीमधील फोरेस इंजिनिअरिंग कंपनी व्यवस्थापनाने सध्या कंपनीसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा शासनाने बंद केल्याने रविवारपासून (ता.२५) बंद ठेवली आहे त्यामुळे कामगारात तीव्र संतापाची लाट उसळली असून अचानक कंपनी बंद केल्याने कामगारांसह कुटुंबावर ऐन कोरोनाच्या काळात उपासमारीची वेळ आली असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी जगायचे कसे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पैठण एमआयडीसीमधील फोरेस इंजिनिअरिंग कंपनीने रविवारपासून कंपनीने उत्पादन बंद केले आहे. या कंपनीत सेप्टीवाॅल बनवले जातात. या कंपनीत मोठ्या प्रमाणावर गॅस लागत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गॅस आज रोजी उद्योगांना मिळत नसल्यामुळे व्यवस्थापनाने कामगाराला ले ऑफ देत असल्याची नोटीस गेटवर लावुन कंपनी रविवारपासून बंद केली आहे.

हेही वाचा: एकुलत्या एक भावाला वाचविण्याऱ्या बहिणींनीचा लढा अपयशी, शुभेच्छाही ठरल्या तोकड्या

मात्र या कंपनीच्या खुलाशावर मात्र कामगार आक्रमक झाले असून कंपनी व्यवस्थापन हे प्रशासनासह कामगारांची दिशाभूल करत असल्याचं कामगारांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे कंपनीतील जवळजवळ शंभर कामगारावर उपासमारीची वेळ येणार आहे. कंपनीने मागील चार वर्षांपासून कामगाराच्या अनेक सवलती बंद केलेल्या असून कामगाराचे मागील सहा महिन्यांपासून वेतन दिले नाही. कामगारांचे हक्काचे बोनस दिलेले नसल्याचे कामगारांनी सांगितले असून कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ कंपनी सुरू करण्याची मागणी या कंपनीतील न्यू पॅंथर कामगार सेना शाखेचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम सचिव सुरेश शिंदे , बाबासाहेब बडे, अशोक मोरे, कल्याण सरगसह अनेक कामगारांनी केली आहे.

हेही वाचा: Corona: पहिल्या दिवशी 'पॉझिटिव्ह' तर दुसऱ्या दिवशी 'निगेटिव्ह’; रुग्णांच्या मनात धास्ती

शासनाच्या आदेशानुसार ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे कंपनीचे उत्पादन बंद झाले आहे. कामगारांना ले-ऑफ देण्यात आला आहे. ऑक्सिजन उपलब्ध झाल्यानंतर व्यवस्थापन लगेच कंपनी सुरू करेल.

- सी. जे.तोतला, सरव्यवस्थापक, फोरेस इंजिनिअरिंग