esakal | औरंगाबाद लॉकडाऊन अपडेट्स: ग्राहकांसाठी शनिवारी बॅंका बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Collector Sunil Chavan

गेल्या शनिवारी आणि रविवारी जनतेकडून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. बंद पाळण्यासाठी पोलिसांना दंडूका उगारण्याची वेळ आली नाही.

औरंगाबाद लॉकडाऊन अपडेट्स: ग्राहकांसाठी शनिवारी बॅंका बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अंशत: लॉकडाऊनबरोबर शनिवार आणि रविवार हे विकेंडचे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊनचा यापुर्वीच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे. त्यात या शनिवारी (ता.२०) बॅंकाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या शनिवारी बॅंकांना या विकेंड लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. कोरोनाबाधितांची वाढती संख्या कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. गेल्या ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात आला तर दर शनिवारी व रविवारी पुर्णपणे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ एप्रिलपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गेल्या शनिवारी आणि रविवारी जनतेकडून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. बंद पाळण्यासाठी पोलिसांना दंडूका उगारण्याची वेळ आली नाही. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने व्हिसीद्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून माहिती घेतली. यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बॅंकेसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. गेल्या शनिवारी बॅंकांना पुर्ण लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. या शनिवारी (ता.२०) पुर्ण लॉकडाऊनमध्ये बॅंका बंद ठेवण्यात येणार आहेत.

कर्मचाऱ्यांसाठी बॅंकेचे कामकाज सुरू राहील फक्त ग्राहकांसाठी बॅंका बंद राहणार आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी लागणारे बेड वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अजून गतिमान करणार आहोत. पेशंट ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट यासाठी अतिरिक्त टीम वाढवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात वाढीव कोरोना रुग्णसंख्येच्या प्रमाणात प्रशासन सर्वतोपरी सर्व यंत्रणांच्या मदतीने सज्ज आहे. शहरासह ग्रामीण भागातही चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे.

ग्रामीण भागीतल रूग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहेत. लक्षणे नसलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात एकुण ११५ उपचार सुविधांमध्ये ७ हजार ८१६ बेड उपलब्ध आहेत. यामध्ये ११ हजार ७६३ आयसोलेशन बेड, २ हजार १२४ ऑक्सिजन बेड, तर ५३२ आयसीयु बेड, तसेच ३०० व्हेंटीलेटर असल्याचे सांगितले.

तसेच जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. लसीकरणासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात तर शहरात 33 ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. तसेच मोबाईल व्हॅनद्वारे देखील लसीकरणाची सुविधा तयार असल्याचे जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

loading image