Breaking| शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दूल सत्तार आणि पोलिस हवालदारामध्ये शाब्दिक चकमक; घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

Aurangabad breaking news
Aurangabad breaking news

औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या बंदोबस्तावर असलेले पोलिस कॉन्स्टेबल व राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. विरोधी पॅनलच्या लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप राज्यमंत्र्यांनी त्या पोलिसांवर केला यावर भडकलेल्या पोलिसांनी सत्तार यांना उत्तर दिल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 जागांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी 48 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. या वेळी मतदान केंद्रावर तैनात असलेले क्रांती चौक पोलिस ठाण्याचे हवालदार संजय भोकरे यांनी मतदान केंद्रावर दोन तासापासून बसलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण यांना केंद्रा बाहेर जाण्याची विनंती केली.

त्यावर सत्तार यांचा चांगलाच पारा चढला व तू सांगणारा कोण असे म्हणत तू विरोधकांची पैसे खाल्ले आहेत, असा आरोप केला. त्यावर संतप्त झालेल्या पोलिसांनी ही मी पैसे खाल्ले असेल तर तपासणी करा असे थेट उत्तर दिले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अनेकांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. दरम्यान हे प्रकरण पोलिस आयुक्तांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com