esakal | वैद्यकीय सुविधा कशा उभारणार? शपथपत्र देण्याचे खंडपीठाचे केंद्र, राज्याला आदेश

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय उपचार
वैद्यकीय सुविधा कशा उभारणार? शपथपत्र देण्याचे खंडपीठाचे केंद्र, राज्याला आदेश
sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रिक्तपदांसह आरोग्य यंत्रणेसमोरील सोयीसुविधांच्या उणीवांचा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench)अक्षरशः पाढा वाचला. खासदार इम्तियाज यांनी पार्टी इन पर्सन जनहित याचिका दाखल केली असून सुनावणीदरम्यान खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी केंद्र आणि राज्य शासनाला नोटीस बजावण्याचा आदेश मंगळवारी (ता.४) दिला आहे. सदर याचिकेवर पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे. (Aurangabad Breaking News When Medical Facility Set Up? Aurangabad Bench Asks State, Centre)

हेही वाचा: औरंगाबादेत १६ मेपासून हेल्मेट सक्ती, खंडपीठाने खडसावल्यानंतर पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’

आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे कशी भरणार आणि वैद्यकीय सुविधा कशा उभारणार याबाबत शपथपत्र दाखल करा असेही खंडपीठाने केंद्र आणि राज्य शासनाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे. जलील यांनी याचिका दाखल करत मंगळवारी ऑनलाईन सुनावणीवेळी व्यक्तिशः बाजू मांडली. कोरोनाच्या सर्व रुग्णांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.