निवडणुका होतच राहतील, अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी - पंतप्रधान मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्पीय अधिवेशन : देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी - PM मोदी

निवडणुका होतच राहतील, येणारं वर्ष देशाला नव्या आर्थिक उंचीवर नेण्यासाठी एक संधी आहे असं मोदींनी म्हटलं.

अर्थसंकल्पीय अधिवेशन : देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी - PM मोदी

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आज राष्ट्रपतींचे अभिभाषण झाल्यानंतर उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान, आज अधिवेशनात आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासादारांना अर्थसंकल्पी अधिवेशनात देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी असं आवाहन केलं आहे. निवडणुका होतच राहतील, येणारं वर्ष देशाला नव्या आर्थिक उंचीवर नेण्यासाठी एक संधी आहे असं मोदींनी म्हटलं. (Union Budget 2022 Live Updates)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होतेय. मी देशभरातील सर्व खासदारांचे स्वागत करतो. सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. हा अर्थसंकल्प जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतात लसीकरण मोहिम, भारताची स्वदेशी लस, पूर्ण जगात एक विश्वास निर्माण करत आहे. या अर्थसंकल्प अधिवेशनातील आपलं बोलणं, चर्चेचे मुद्दे, होणारी चर्चा ही जागतिक प्रभावाची मोठी संधी बनू शकतात. सर्व पक्षांनी मोकळ्या मनाने चर्चा करून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी मदतीचे ठरेल.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यातच देशभरात अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संसदेत जाण्याआधी बोलताना म्हटलं की, अनेकदा निवडणुकामुळे अधिवेशन, चर्चेवर परिणाम होतो. पण सर्व खासदारांना विनंती आहे की, निवडणुका आपआपल्याजागी आहे. त्या होतच राहीतल. पण आपण सदनात कटिबद्ध राहून अर्थसंकल्प जितका यशस्वी करता येईल त्यासाठी प्रयत्न करायला हवा. येणारं वर्ष आपल्याला नव्या आर्थिक उंचीवर नेण्यासाठी संधी ठरेल. चांगल्या उद्देशाने चर्चा व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.

Web Title: Pm Narendra Modi Before Budget Session 2022 Start In Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top