शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी, ऊस घेऊन मंत्रालयात घुसणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Chhawa Maratha Yuva Sanghatana in support of farmer sugarcane

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी, ऊस घेऊन मंत्रालयात घुसणार

औरंगाबाद : मराठवाड्यात १८ ते १९ महिने उलटून गेले तरी शेतात उभा आहे. या संदर्भात सरकार निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरत शिल्लक असलेला उसाचा प्रश्‍न मार्गा लावा, अन्यथा मंत्रालयात येत आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला.

या संदर्भात क्रांती चौकातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जावळे यांनी विविध मागण्याचे निवेदन दिले. श्री. जावळे म्हणाले की, कारखानदारांनी शिल्लक राहिलेला ऊस तोडून न्यावा तसेच तोडणीपासून वंचित असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत तत्काळ जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयकुमार घाडगे, भिमराव मराठे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील,प्रदेश संघटक आप्पासाहेब कुढेकर,संतोष जेधे,डॉ.गोविंद मुळे, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे,किशोर शिरवत, शिवाजी मार्कंडे,देवकार्य वाघ,नितीन पटारे,दशरथ कपाटे,राजाभाऊ वाघले,सिदाजी जगताप, किरण काळे पाटील, मनोज मुरदारे, राधेश्याम पवळ, गोविंद जाधव, संदिप तांबडे, विष्णू मोगल, मनोहर सनेर, जालिंदर एरंडे, अमोल काळे, गिरीधर चव्हाण, प्रशांत खंडागळे, आप्पासाहेब जाधव, अर्जुन खराद, गजानन पवार, अण्णासाहेब कोल्हे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Aurangabad Chhawa Maratha Yuva Sanghatana In Support Of Farmer Sugarcane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top