

Sambhajinagar Students Crisis
esakal
चिकलठाणा: औद्योगिक परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी आणि प्रोद्यौगिकी संस्था अर्थात ‘सिपेट’ या संस्थेकडे देशभरात उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविणारी संस्था म्हणून पाहिले जाते. याच संस्थेतून अभियंते, उद्योजक बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तब्बल १२५ ते १३० विद्यार्थ्यांना होस्टेलवर राहताना मेसमध्ये चक्क चार ते पाच दिवस गॅसअभावी केवळ खिचडीवर दिवस काढावे लागले होते. मेसच्या कंत्राटदाराला गॅस सिलिंडर मिळत नसल्याचे स्पष्ट होताच ‘सिपेट’ने मेसच्या कंत्राटदाराचे काम थांबविले. यामुळे विद्यार्थ्यांना उपाशीपोटीच घरचा रस्ता धरावा लागला आहे.