Aurangabad News : ते आले, त्यांनी पाहिले अन् शहर स्वच्छ करून गेले

विविध जिल्ह्यांतून आलेल्या ‘श्री सदस्यां’नी औरंगाबाद शहरातील विविध परिसरांत जाऊन रस्त्यांवरील कचरा, पाला-पाचोळा, परिसरातील कचरा, गवत गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSakal
Summary

विविध जिल्ह्यांतून आलेल्या ‘श्री सदस्यां’नी औरंगाबाद शहरातील विविध परिसरांत जाऊन रस्त्यांवरील कचरा, पाला-पाचोळा, परिसरातील कचरा, गवत गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.

औरंगाबाद - शहरातील अनेक नागरिक साखर झोपेत असताना विविध जिल्ह्यांतून आलेल्या ‘श्री सदस्यां’नी शहरातील विविध परिसरांत जाऊन रस्त्यांवरील कचरा, पाला-पाचोळा, परिसरातील कचरा, गवत गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.

शहरात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्याकरिता डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहर, छावणी परिषद व वाळूज औद्योगिक व नागरी वसाहतीमध्ये रविवारी (ता.२५) महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ६७ हजार ४३२ श्री सदस्य सहभागी झाले होते. या श्री सदस्यांनी शहरातील विविध भागांतून ७४८ टन कचरा गोळा करत अवघ्या तीन तासांत शहर स्वच्छ केले. स्वच्छता व सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेचे महत्त्व व त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने रविवारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोहिमेत भाग घेऊन शहर स्वच्छ केले. या सदस्यांना ना कुठले मानधन दिले जाते, ना मोबदला. केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून हे कार्य सुरू आहे.

दरम्यान रविवारी सकाळी ७.३० वाजता क्रांती चौकातून अभियानाची सुरवात झाली. यावेळी राहुल धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासह बैठकीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री सदस्यांनी सकाळी १०.३० वाजेपर्यंत १९ जिल्ह्यातील श्री सदस्यांनी रस्त्यांवरील कचरा उचलून कचरा गोळा करत त्याची विल्हेवाट लावली. दरम्यान ७८ मार्गावर हे अभियान राबविण्यात आले असून, याठिकाणी जमा झालेला कचरा उचलण्यासाठी महापालिकेने २९२ घंटागाड्या, १८ कॉम्पॅक्टर, १२ हायवासह ट्रॅक्टर, टिप्पर उपलब्ध करून दिले होते. दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने शहरात २०१९ ला महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.

महापालिकेच्या घंटागाड्या कमी पडल्या

  • पांढरी टोपी व पांढरा सदरा घालून श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम राबविली. शहरातील विविध भागांत स्वच्छतेसाठी १० झोन.

  • शहर परिसरातील सर्व मुख्य रस्त्यांची सफाई.

  • रस्‍त्यालगत एक कि.मी.आतपर्यंत जागेवर स्वच्छता

  • शहरातील ७८ मार्गांवर हे अभियान राबविण्यात आले.

  • गोळा केलेला कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या कमी पडल्या.

या जिल्ह्यातील ‘श्री सदस्यां’नी दिली सेवा

  • सोलापूर - गजानन मंदिर ते बाबा पेट्रोल पंप, कोकणवाडी, रेल्वे परिसर, बेंबडे हॉस्पिटल ते देवळाई परिसर.

  • नगर - आम्रपाली बुद्धविहार वाळूज ते दत्तनगर.

  • उस्मानाबाद - आकाशवाणी चौक ते सतीश मोटर, वरद गणेश मंदिर परिसर.

  • खामगाव - जय भवानीनगर चौक ते हनुमाननगर चौक.

  • चाळीसगाव - सिडको महानगर-१ वाळूज पूर्ण परिसर.

  • चिखली - मुकुंदवाडी ते धूत रुग्णालय परिसर.

  • जळगाव - शहागंज ते जळगाव हर्सूल टी पॉइंट, टी पॉइंट ते एपीआय कॉर्नर परिसर.

  • जामनेर - मिलकॉर्नर ते छावणी परिसर, नागसेनवन, विद्यापीठ परिसर.

  • जालना - अग्रेसन चौक ते मुकुंदवाडी पोलिस परिसर.

  • तुळजापूर - क्रांती चौक ते गुलमंडी कोहिनूर इन्स्टिट्यूट.

  • देऊळगाव राजा- मुक्ताई- बुलडाणा-मलकापूर - भडकल गेट ते मिलकॉर्नर, पडेगाव ते मिलकॉर्नर, एपीआय कॉर्नर ते मुकुंदवाडी पोलिस परिसर.

  • धुळे - ओवैसी चौक ते वाळूज पोलिस, ओवैसी चौक ते दत्तनगर फाटा. पंढरपूर - मिलकॉर्नर ते सिटी चौक.

  • नाशिक - मोहटादेवी मंदिर ते सिडको गार्डन वाळूज.

  • बीड - कॅनॉट प्लेस ते गजानन मंदिर परिसर.

  • रावेर - शहागंज ते भडकल गेट, भडकल गेट ते रंगीन दरवाजा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com