Aurangabad: कंपनी व्यवस्थापकासह सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

औरंगाबाद : कंपनी व्यवस्थापकासह सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील अवनीश इंटरप्रायजेस कंपनीच्या व्यवस्थापकासह सुरक्षारक्षकावर पूर्ववैमनस्यातून एकाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर कंपनीच्या आवारात तीघेजण घुसले त्यांनी, सुरक्षारक्षक माणिक देवराव पहुरे (४४, रा.संजयनगर, मुकूंदवाडी) यांना आणि कंपनीचे व्यवसथापक जोशी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी पहुरे यांना पकडून हल्लेखोरांनी त्यांच्या तोडाला चिकटटेप लावला होता. हा प्रकार घडत असतांना काही लोक तेथे जमा झाल्यावर हल्ला करणाऱ्यांनी जमा झालेल्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

या घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मांटे करीत आहेत.

loading image
go to top