Aurangabad : बांधकामासाठीचे प्रस्ताव फक्त ऑनलाइन पद्धतीनेच

साडेसहा महिन्यांत ६०९ प्रस्ताव, ३३२ दिल्या परवानगी
online
online

औरंगाबाद : राज्य शासनाने शहरातील बांधकामासाठीचे प्रस्ताव ऑफलाईन बंद करून फक्त ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनच प्रक्रिया भारी अशी म्हणण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडे साडेसहा महिन्यात ६०९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत तर केवळ ३३२ बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच यापूर्वी जमा असलेल्या ऑनलाइन फाईलमधून ५४ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे.

ऑनलाइन फायलींतून १० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. राज्य शासनाने एक एप्रिलपासून बांधकाम परवानगी ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वास्तूविशारदांकडून ऑनलाइन प्रस्ताव नगर रचना विभागाला दिले जात आहेत. मात्र वेबसाईटमधील अडचणींमुळे प्रस्ताव दाखल होण्याचे प्रमाण कमीच आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक एप्रिल ते १६ ऑक्टोबर दरम्यान बांधकाम परवानगीसाठी ६०९ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी ३३२ जणांना बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. नगररचना विभागाकडे सप्टेंबर महिन्यात ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी १२२ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी १९ बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन बांधकाम परवानगीतून आत्तापर्यंत नऊ कोटी ७९ लाख रुपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. यापूर्वी ऑफलाईन बांधकाम परवानगी दिली जात होती. अनेकांनी त्यात अनेकांनी फाइल दाखल केल्या होत्या. या फाइल आता निकाली काढल्या जात आहेत. त्यातून ५४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन पद्धतच बरी असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com