esakal | चांगली बातमी! औरंगाबादची रुग्णसंख्या महिनाभरात निम्म्याने घटली

बोलून बातमी शोधा

Aurangabad recovery rate increased
चांगली बातमी! औरंगाबादची रुग्णसंख्या महिनाभरात निम्म्याने घटली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचे हाल सुरूच असून, दुसरीकडे शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा झपाट्याने खाली येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात २६ मार्चला १० हजार ८९० सक्रिय रुग्ण होते. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार ९४८ एवढी आहे.

शहरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे एकट्या मार्च महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३२ हजार कोरोनाबाधित निघाले. या रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे प्रशासनाने कमी त्रास असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला.

हेही वाचा: अठरा वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी

दरम्यान, केंद्रीय पथकाने शहरात दोनवेळा येऊन परिस्थितीचा आढावा घेतला व चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवले. दुसरीकडे लसीकरणाला गती दिली. सहा एन्ट्री पॉइंटवर ॲन्टीजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या. परिणामी शहरात येणारे बाधित शहराबाहेरच थांबले ल संसर्गाला ब्रेक लागला.

हेही वाचा: दिलासादायक! औरंगाबादेत प्रतिदिन रुग्णसंख्या १ हजारच्या आत; चौदाशे जण कोरोनामुक्त

त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. गेल्या महिन्यात २६ मार्चला शहरात १० हजार ८९० सक्रिय रुग्ण होते. २६ एप्रिलला सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ९४८ एवढी आहे.