esakal | दिलासादायक! औरंगाबादेत प्रतिदिन रुग्णसंख्या १ हजारच्या आत; चौदाशे जण कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

corona

दिलासादायक! औरंगाबादेत प्रतिदिन रुग्णसंख्या १ हजारच्या आत; चौदाशे जण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्यांचे प्रमाण जास्त असल्याचे मंगळवारीही (ता. २७) दिसले. गेल्या आठवड्यापर्यंत दररोज रुग्णसंख्येचा आकडा साधारणतः हजार-दीड हजाराच्या आसपास असताना आज तो एक हजारापेक्षा कमी झाला. दिवसभरात ९५८ कोरोनाबाधित आढळले तर एक हजार ४०९ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील ६५९ तर ग्रामीण भागातील ७५० जणांचा समावेश आहे. शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

उपचारादरम्यान २६ जणांचा मृत्यू झाला. जाधववाडी, हडको येथील महिला (वय ५५), मिलकॉर्नर भागातील पुरुष (७०), सिल्लोडमधील पुरुष (६५), पैठणमधील पुरुष (४०), चिश्‍तिया कॉलनीतील महिला (२५), सिल्लोडमधील महिला (७४), गेवराईतील पुरुष (६५), मिलकॉर्नर भागातील महिला (५५), समतानगरातील महिला (६०), सिल्लोडमधील पुरुष (२८), पिंपरी (जि. औरंगाबाद) येथील महिला (७०), सिडको एन-आठ भागातील महिला (६३),

हेही वाचा: पंकजा मुंडेचं बीडमधील रेमडेसिव्हिरच्या अवैद्य विक्रीवरून अजित पवारांना पत्र

नगमठाण (जि. औरंगाबाद) येथील महिला (६३), पावरी (ता. सोयगाव) येथील मुलगा (१ महिना), डाभरूल तांडा (ता. पैठण) येथील पुरुष (७३), चौका (ता. पैठण), बानोटी तांडा (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (७०), मोहरा (ता. कन्नड) येथील पुरुष (५६), इंदिरानगर, औरंगाबाद येथील महिला (६०), वाळूज येथील पुरुषाचा (३२) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. इतर रुग्णालयांत सहा जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: जोरदार वादळी वाऱ्याने घरांची पडझड,औरंगाबाद तालुक्यात एक जण जखमी

आतापर्यंत बाधित १२०५६६

बरे झालेले रुग्ण १०५६४१

उपचार घेणारे १२४९८

आतापर्यंत मृत्यू २४२७