esakal | Corona Update : औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच, आज २०१ रुग्णांची वाढ, ११४ पुरूष, ८७ महिला रुग्णांचा समावेश 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. शनिवारी (ता.२७) सकाळी २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. कोरोना रुग्ण वाढीची साखळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज वाढ झालेल्या रुग्णांमध्ये १२५ रुग्ण मनपा हद्दीतील, ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये ११४ पुरूष, ८७ महिला आहेत.

Corona Update : औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच, आज २०१ रुग्णांची वाढ, ११४ पुरूष, ८७ महिला रुग्णांचा समावेश 

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. शनिवारी (ता.२७) सकाळी २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. कोरोना रुग्ण वाढीची साखळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज वाढ झालेल्या रुग्णांमध्ये १२५ रुग्ण मनपा हद्दीतील, ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये ११४ पुरूष, ८७ महिला आहेत.

 आतापर्यंत एकूण ४७२३ कोरोनाबाधित आढळले असून २३७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २११६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

आज शहरातील आढळलेले रुग्ण 

 लेबर कॉलनी परिसर (१), नंदनवन कॉलनी (१), आंबेडकर नगर (१), भक्ती नगर, पिसादेवी रोड (१), चंपा चौक, शहा बाजार (१), गणेश कॉलनी (१), बुढ्ढी लेन, कबाडीपुरा (१), होनाजी नगर (२), सिडको (३), सावंगी (१), सुरेवाडी (१), भगतसिंग नगर (२), जालान नगर (१), हर्सुल परिसर (४), अविष्कार कॉलनी (१), एन सात सिडको (१), बाबा पेट्रोल पंपाजवळ (१), मथुरा नगर, सिडको (१), नागेश्वरवाडी (१), सिडको एन सहा (२), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (३), बालाजी नगर (२), हनुमान नगर (३), भानुदास नगर (३), संजय नगर (३), गजानन नगर (१०), विष्णू नगर (२), न्याय नगर (२), एन आठ, सिडको (२), रेणुका नगर (१), पुंडलिक नगर (२), न्यू हनुमान नगर (१), ज्योती नगर (१), मिल कॉर्नर (२), जय भवानी नगर (२), बेगमपुरा (१), उस्मानपुरा (३), नाथ नगर (१), जिन्सी बाजार (५), हर्षल नगर (१), सिडको एन अकरा (१), सिडको एन तेरा (२), सिडको एन दोन (२), विशाल नगर (२), हडको एन बारा (१), जाधववाडी (३), सिडको एन सात (३), सिल्म मिल कॉलनी (१), न्यू विशाल नगर, गारखेडा (१), जुना बाजार (७), काबरा नगर, गारखेडा (२), छत्रपती नगर, बीड बायपास (३), हिंदुस्तान आवास (२), अजब नगर (१), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (१), सिडको (१), टाऊन सेंटर (१), जिजामाता कॉलनी (१), घृष्णेश्वर रुग्णालयाजवळ (१), गुरूदत्त नगर (४), शिवाजी नगर (३), सातारा परिसर (४) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

ग्रामीण भागातील रुग्ण

कापड मंडई, पैठण (१), भांबरडा (४), कुंभेफळ (१), बेलूखेडा, कन्नड (२), वडनेर, कन्नड (२), सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (१), स्वामी समर्थ नगर, आंबेडकर चौक, बजाज नगर (२), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (७), लोकमान्य चौक, बजाज नगर (२), शिवालय चौक, बजाज नगर (१), शिवालय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), बौद्ध विहारसमोर, बजाज नगर (१), लोकमान्य नगर, बजाज नगर (१), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (४), सिडको महानगर (१), यशवंती हाऊसिंग सोसायटी (१), न्यू दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी (३), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (२), श्रद्धा कॉलनी (१), जीवनधारा हाऊसिंग सोसायटी (१), ज्योर्तिलिंग हाऊसिंग सोसायटी (१), जय भवानी चौक (१), ऋणानुबंध हाऊसिंग सोसायटी (१), साऊथ सिटी (३), न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी (२), कोलगेट कंपनी जवळ (१), चिंचवन कॉलनी (१), बजाज नगर (१), अश्वमेध हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), ग्रोथ सेंटर, सिडको वाळूज महानगर (१), साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (१), सिडको वाळूज महानगर एक (२), गणेश हाऊसिंग सोसायटी (१), शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), श्रीगणेश हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), गोदावरी कॉलनी, पैठण (१), शिवाजी नगर, गंगापूर (२), गणपती गल्ली गंगापूर (१), वाळूज, गंगापूर (८), पद्मपूर, गंगापूर (१), बालाजी नगर, सिल्लोड (१), बालेगाव, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

कोरोना मीटर -
बरे झालेले रुग्ण  - २३७३
उपचार घेणारे    - २११६
एकूण मृत्यू       - २३४
आतापर्यंतचे बाधित - ४७२३