esakal | Corona Updates : औरंगाबादेत ५८ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४६ हजार ८९ कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

आजपर्यंत एकूण १ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Corona Updates : औरंगाबादेत ५८ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४६ हजार ८९ कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.१४) ५८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ६४५ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी ३४ जणांना सुटी झाली. यात शहरातील २९ व ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ४६ हजार ८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.


शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : नक्षत्रवाडी (१), संजय नगर, बायजीपुरा (२), छावणी(१), हर्सूल (१), कर्णपुरा (१), मनीषा कॉलनी (१), विष्णू नगर (१), कांचनवाडी (१), पदमपुरा (१), उल्का नगरी (१), प्रकाश नगर (१), गारखेडा परिसर (२), राम नगर (१), धावणी मोहल्ला (१), एन सहा (१), टिळक नगर (१), एन चार (१), समर्थ नगर (१) अन्य (२७)

ग्रामीण भागातील बाधित :  कोंड,वरूड (१), अन्य (१०)


कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : ४६०८९
उपचार घेणारे रुग्ण : ३११
एकुण मृत्यू : १२४५

आतापर्यंतचे बाधित : ४७६४५

संपादन - गणेश पिटेकर

loading image