esakal | Corona Vaccination : खासगी रुग्णालयातून ६९ हजार जणांनी घेतली लस
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination : खासगी रुग्णालयातून ६९ हजार जणांनी घेतली लस

Corona Vaccination : खासगी रुग्णालयातून ६९ हजार जणांनी घेतली लस

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरातील Aurangabad मोफत लसीकरण Corona Vaccination बंद असल्याने नागरिकांनी आता खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली आहे. शासनाने खासगी रुग्णालयांना लसीकरणाचे दर ठरवून दिले आहेत. त्यानुसार शहरातील अनेक रुग्णालयांनी लसीकरण सुरू केले आहे. खासगी रुग्णालयातून आतापर्यंत ६९ हजार ६०८ जणांनी लस घेतली असल्याचे महापालिकेच्या Aurangabad Municipal Corporation आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. शहरात आतापर्यंत चार लाख ७९ हजार ९७६ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी एक लाख ११ हजार जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. मात्र सध्या लस Corona उपलब्ध नसल्याने दोन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. मोफत लसीकरण बंद असले तरी खासगी रुग्णालयात मात्र पैसे घेऊन लसी दिल्या जात आहेत.aurangabad corona vaccination updates above 69 thousand people vaccinated in private hospitals

हेही वाचा: Aurangabad: पिकांमध्ये निलगायींचे धुडगूस, शेतकऱ्यांमध्ये दहशत

हे रुग्णालये थेट कंपन्यांकडून लसी घेत असून, शासनाने त्यांच्यासाठी दर ठरवून दिले आहेत. सुरुवातीला महापालिकेने केवळ सर्व्हिस चार्ज आकारून लसीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालयांना लसी दिल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत खासगी रुग्णालयांमध्ये ६९ हजार ६०८ जणांचे लसीकरण झाल्याचे डॉ. पाडळकर यांनी नमूद केले.

हेही वाचा: भागवत कराडांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदाचा स्वीकारला पदभार

असे आहेत दर

शासनाने खासगी रुग्णालयांना कोव्हिशिल्ड Covishield ६३०, कोव्हॅक्सीन Covxin १२६० व स्पुटनिक ९४८ रुपयांना उपलब्ध करून दिली आहे. यावर सर्व्हिस चार्ज म्हणून खासगी हॉस्पिटल १५० रुपये आकारू शकतात. शहरात स्पुटनिक लस उपलब्ध नसली तरी कोव्हॅक्सीन व कोव्हिशिल्ड लसी खासगी रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्यानुसार नागरिक खासगी रुग्णालयात जाऊन लस घेत असल्याचे चित्र आहे. काही रुग्णालयांनी सीएसआर फंडातून देखील लस खरेदी करून कमी किमतीत ती नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.

loading image