औरंगाबाद : दांपत्याने दिला लाकडी घाण्याला उजाळा

दिले उद्योगाचे स्वरूप, औरंगाबादेत सात प्रकारच्या खाद्यतेलांचे उत्पादन
Aurangabad couple lighted the wooden grinder edible oil
Aurangabad couple lighted the wooden grinder edible oilsakal

दांपत्याने दिला लाकडी घाण्याला उजाळा

दिले उद्योगाचे स्वरूप, औरंगाबादेत सात प्रकारच्या खाद्यतेलांचे उत्पादन

संदीप लांडगे

औरंगाबाद : औरंगाबाद येथील वीरेंद्र आणि गार्गी दौड या नवदांपत्याने चिकलठाणा एमआयडीसीत लाकडी घाण्यावरील खाद्यतेल निर्मितीची ‘ऑर्गिसत्त्व’ या नावाने सुरू केली आहे. सुमारे सात प्रकारच्या तेलांची निर्मिती ते करतात. शुद्ध व नैसर्गिकरीत्या उत्पादित खाद्यतेलांची मागणी लक्षात घेऊन सध्या ‘स्टार्टअप’ अवस्थेत असलेला हा व्यवसाय भविष्यात विस्तारण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सध्याच्या काळात आयुर्वेदिक, सेंद्रिय, नैसर्गिक अशा शब्दांचे महत्त्व वाढू लागले आहे. ग्राहक आरोग्याबाबत अत्यंत जागरूक झाल्यानेच तो अशा उत्पादनांची मागणी करू लागला आहे. काळाची हीच गरज वीरेंद्र व गार्गी यांनी ओळखली. हे दांपत्य शहरातील चिकलठाणा परिसरात राहतात. शेतीची त्यांना तशी काहीच पार्श्वभूमी नाही. वीरेंद्र पूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत होते. मात्र, खाद्यतेलनिर्मितीच्या निमित्ताने त्यांचा आता शेतीप्रक्रिया उद्योगाशी संबंध येऊ लागला आहे.

प्रक्रिया उद्योगाची चालना खाद्यतेल हा स्वयंपाकाचा पाया आहे. हा पायाच जर अधिक शुद्ध, सात्त्विक व नैसर्गिक असेल, तर तयार होणारे पदार्थही त्याच गुणवत्तेचे असतात. पण, हे करायचे कोणी? आपणच का सुरू करू नये? अशीच संकल्पना मनाशी बाळगून हे दांपत्य खाद्यतेल निर्मितीत उतरले. अर्थात, हा व्यवसाय म्हणजे ''सेकंड इनिंग'' आहे. मात्र, त्यात खूप समाधान असल्याचे ते सांगतात. आठ ते दहा वर्षे इव्हेंट मॅनेजमेंटचा अनुभव असल्याने शिस्त, कार्यपद्धती, व्यावसायिक दृष्टिकोन त्यांचे काम सुरू असून दिवसेंदिवस शुद्ध तेलाची मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

...आणि उद्योग उभा केला

कोरोना काळात मागील वर्षी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. यावेळी कुटुंबासोबत चर्चा करून नोकरी सोडून खाद्यतेलनिर्मिती उद्योग सुरू करण्याबाबत चर्चा केली. सुरुवातीला घरातील सर्व मंडळीने विरोध केला होता. मात्र, तरीही उद्योग सुरू करायचा ठरविला. त्यासाठी सुमारे वर्षभर तेलबिया, तेले, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. नगर, पुणे, नाशिक येथील तेलघाणा उत्पादन प्रशिक्षणात जाऊन माहिती घेतली. तसेच प्रयोगशाळेतील आवश्यक चाचण्या शिकून घेतल्या. लाकडी घाण्याचे दोन आणि कोल्डप्रेसची दोन असे एकूण चार यंत्र खरेदी केले. सुमारे चार हजार चौरसमीटर जागेत उत्पादन सुरू केले आहे.

विक्री व्यवस्था सध्या बहुतांशी ग्राहक बाजारातील रिफाइंड तेलाचाच वापर करतात. घाणीचे तेल ही जुनी मात्र आरोग्यासाठी चांगली पद्धत काळानुरूप लुप्त होत आहे. त्याला दौड दांपत्य पुनरुज्जीवित करीत आहेत. सध्या आपले ओळखीचे लोक, नातेवाईक, हितचिंतक यांच्याद्वारे त्या तेलांचे मार्केटिंग करीत आहेत. व्यवसायाला अलीकडेच सुरुवात केली असली तरी पाच हजारांपेक्षा जास्त ग्राहक, शेतकऱ्यांनी त्यांच्या स्टार्टअपला भेट देऊन माहिती घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com