मोठ्या मुलाने केला जन्मदात्या वडिलाची हत्या, पोलिसांनी आठ तासातच लावला छडा

पोलिसांच्या नजरेत नजर मिळवीत नव्हता. त्याचबरोबर वडिलांचे निधन झाले तरीही रोहिदास पवारच्या डोळ्यात एकही थेंब दिसून आला नसल्याने पोलिसांचा संशय आणखीच वाढला.
मोठ्या मुलाने केला जन्मदात्या वडिलाची हत्या, पोलिसांनी आठ तासातच लावला छडा

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील (Phulambri) मुर्शिदाबादवाडी येथील एका ६५ वर्षीय वृद्धाचा खुन केल्याची घटना शुक्रवारी (ता.१४) सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सदर घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना (Phulambri Police) मिळताच या प्रकरणी चौकशी अंती स्वतःच्या मोठ्या मुलाने खून केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी मुलगा योगेश पवार याच्या फिर्यादीवरून योगेशचा मोठा भाऊ रोहिदास परसराम पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परसराम आप्पाराव पवार (वय ६५ , रा.मुर्शिदाबादवाडी, ता. फुलंब्री) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, परसराम पवार यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुले वेगवेगळे राहतात. छोट्या मुलाबरोबर परसराम व त्यांची पत्नी हे एकत्र राहतात. मोठा मुलगा रोहिदास पवार व छोटा मुलगा योगेश पवार यांच्यात नेहमीच कधी भाऊ हिशाच्या वाटणीवरून, तर कधी बैल देण्या-घेण्यावरुन वाद होत असे. (Aurangabad Crime News Son Kills Father In Phulambri Block)

मोठ्या मुलाने केला जन्मदात्या वडिलाची हत्या, पोलिसांनी आठ तासातच लावला छडा
पुण्यात पत्रकार पांडूरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू 

या वादात परसराम पवार हे लहाना मुलगा योगेश यांची बाजू घेऊन बोलत असल्याचा व त्यास पैसे देत असल्याचा राग मनात धरून होता. परसराम यांचा खून करण्याचे काम मोठ्या मुलाने मनात भरून घेतले होते. रोहिदास पवारने आई वडील हे त्याचामध्ये राहत नसल्याने व ते त्यास पैसे देत नसल्याने नेहमी वाद घालत होता. रोहिदास पवारला वडील चौका येथे एकटेच असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी (ता.१३) रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याचे मोटारसायकलवर चौका येथून घरी घेऊन जात असताना गणोरी फाटा येथे आणून वाद घातला. परसराम पवार यांनी दारुच्या नशेत मोठा मुलगा रोहिदास पवार याला चापटाने मारहान केली. त्यावेळी पित्त खवळलेला रोहिदास पवार याने वडील परसराम पवार यांच्या उजव्या डोळयांवर बुक्कीने मारले. त्यानंतर डोक्यांवर व कानावर दगडाने मार देऊन गंभीर जखमी करुन ठार केले.

मोठ्या मुलाने केला जन्मदात्या वडिलाची हत्या, पोलिसांनी आठ तासातच लावला छडा
साखर कारखान्यात देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प सुरु, मुख्यमंत्री ठाकरेंनी केले उद्घाटन

फुलंब्री पोलिसांना घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व फुलंब्री पोलिस घटना स्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनसाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल, पोलीस उपअधीक्षक पुजा गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक अशोक मुगदिराज , सहायक पोलिस निरीक्षक श्री. खंदारे, पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, पोलिस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक रघुविर मुराडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश राउत, पोलिस उपनिरीक्षक श्री. सांळुके यांनी गुन्ह्याचा आठ तासात छडा लावून आरोपीला जेरबंद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com