वैजापूर तालुक्यात नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

वैजापूर तालुक्यात नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

शिऊर (जि.औरंगाबाद) : निमगाव (ता.वैजापूर) (Vaijapur) येथे सासरच्या जाचास कंटाळून ( Woman Harassment) नवविवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१२) उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासू, सासऱ्याविरुध्द शिऊर पोलिस ठाण्यात (Shirur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्पिता नानासाहेब पाटेकर (वय १९, रा.निमगाव) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. पती वाल्मीक भाऊसाहेब त्रिभुवन (वय २५), भाऊसाहेब अहेलाजी त्रिभुवन (सासरा) व सासू विमलबाई भाऊसाहेब त्रिभुवन (रा.निमगाव ता.वैजापूर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिऊर पोलिसांनी सांगितले की, निमगाव येथील रहिवासी वाल्मीक याचा ता.१ एप्रिल रोजी खादगाव (ता.गंगापूर) येथील अर्पिता नानासाहेब पाटेकर (वय १९) हिच्याशी विवाह झाला होता. लॉकडाउन (Lock Down) असल्याने साध्या पद्धतीने विवाह लावून देण्यात आला होता. (Aurangabad Crime News Woman Committees Suicide In Vaijapur Block)

हेही वाचा: औरंगाबादकरांनो मुलांची काळजी घ्या! २६ बालके कोरोनाबाधित

काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासू,सासरे व पती यांनी संगनमत करुन अर्पितास हुंड्याचे राहिलेले ३ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सतत शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक छळ सुरु केला व घराबाहेर हाकलून दिले. वारंवार उलट सुलट बोलून तुझ्या आई वडिलांनी आपला विवाह साध्या पद्धतीनेच करुन दिला, असे सासरची मंडळी म्हणत असे. यानंतर सदर विवाहितेने याबाबत वडिलांना काही दिवसापूर्वी माहिती दिली होती. दरम्यान, अर्पिता बुधवारी पहाटे ४ ते ५ वाजेपासून घरातून बेपत्ता झाली होती. बुधवारी दुपारी निमगाव येथील शेत गट क्र-५० मध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये तिचे प्रेत तरंगत असल्याचे काही लोकांना दिसले.त्यांनी तत्काळ पोलिस पाटील शिवाजी गायकवाड यांना कळविले. त्यांना शिऊर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरख शेळके पोलिस, हेड कॉन्स्टेबल आर. आर. जाधव, कुलदीप नरवडे, अविनाश भास्कर, संदीप धनेधर, गणेश गोरक्ष, सुभाष बकले, महिला कर्मचारी शिकेतोड, काहिटे, भुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पार्थिव बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. शिऊरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन निमगाव येथील शेतवस्तीवर पोलिस बंदोबस्तात विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अर्पिताचे वडिल नानासाहेब छगन पाटेकर (रा. खादगाव ता.गंगापुर) यांच्या फिर्यादिवरून पोलिस ठाण्यात अर्पिताचा पती, सासरा, सासू यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गोरख शेळके हे करीत आहेत.

Web Title: Aurangabad Crime News Woman Committees Suicide In Vaijapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :aurangabad
go to top